Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जळगावात पुन्हा अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ‘गुंडाराज’

5

Jalgaon Ahmed Hussain Firing at the House: अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर पहाटे चार वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या घरातील खिडकीचे काच फुटलेले आहेत. तसेच जिवंत काडतुसे देखील त्या ठिकाणी पडलेले असल्याचे दिसत आहे.

हायलाइट्स:

  • जळगावात पुन्हा अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
  • अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार
  • निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ‘गुंडाराज’
Lipi
जळगाव मेहरुण अहमद हुसेन गोळीबार

निलेश पाटील, जळगाव : जळगावातील मेहरुण परिसरात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. अज्ञाताने त्यांच्या घरावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडल्या गेल्या. अहमद हुसेन शेख यांचे मेहरुण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी खूप गर्दी जमली. अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. आठ दिवसापूर्वीच मुक्ताईनगर येथील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर देखील अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोवर, शहरातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर पहाटे चार वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या घरातील खिडकीचे काच फुटलेले आहेत. तसेच जिवंत काडतुसे देखील त्या ठिकाणी पडलेले असल्याचे दिसत आहे.
Today Top 10 Headlines in Marathi: बड्या नेताने शिवबंधन सोडलं, कमळ हाती, मुस्लिम उमेदवारीवरुन खासदाराला घेरलं, काय म्हणाल्या प्रणिती; सकाळच्या दहा हेडलाईन्स

या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार करणाऱ्यांचा शोध कसून सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात याआधीही मुक्ताईनगर बोदवडमधून निवडणूक लढणारे उमेदवार विनोद सोनवणे यांच्या वाहनावरही गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती.

जळगाव जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना होत असून यामुळे सामान्य नागरिक भयभीत झालेला आहे. गुन्हेगारी वृत्तीकडे जळगाव जिल्हा आता वळू लागला असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे. हा गोळीबार नेमका कशासाठी करण्यात आला? गोळीबार करण्यामागचा हेतू काय होता? हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.

दरम्यान, १५ दिवसांपूर्वी मुक्ताईनगर बोदवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे बोदवड तालुक्यातील राजुर गावात प्रचाराला आले असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनं एकच मोठी खळबळ जळगाव जिल्ह्यात उडाली होती.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.