Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जेवलास का? प्रचाराच्या धामधुमीतही तिचा आवर्जून मेसेज येतो, आदित्य ठाकरेंनी सांगितलं गुपित

6

Aaditya Thackeray on Mother Rashmi Thackeray : कधी कधी असं असतं की जमिनीवर ठेवायला, आई महत्त्वाची असते, म्हणजे ती खेचून घेते आम्हाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आदित्य ठाकरे

मुंबई : प्रचार कार्यात आई आणि वडील या दोघांचीही मदत होते, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. जमिनीवर पाय ठेवायला आई महत्त्वाची असते, अशा भावना आदित्य यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत साधलेल्या एक्स्क्लुझिव्ह संवादात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

रॅपिड फायर राऊण्डमध्ये आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला, की तुमचे कोणाशी सर्वात जास्त सूत जुळतात? उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे, या प्रश्नावर आदित्य यांनी दोघांशी चांगले सूत आहेत, असं उत्तर दिलं. ‘जेवलास का?’ असा आदित्य ठाकरेंना आवर्जून मेसेज करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून, त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आहेत.
Eknath Shinde : राज ठाकरेंसोबत कम्युनिकेशन गॅप पडलाय, एकनाथ शिंदेंची कबुली; म्हणाले, शेवटी तेही…

रश्मी ठाकरेंची कशी होते मदत?

रश्मी ठाकरे यांची प्रचारात कशी मदत होते, असं विचारलं असता, आदित्य म्हणाले, की कधी कधी फोन बघायचा नाही, असा प्रयत्न करतो, कारण प्रश्न असतो जेवलास का? मग वेळेवर जेवलास ना? पाणी पितोस का? हल्ली तर आईने विचारणं पण सोडून दिलंय. नुसतं आल्यानंतर, घरी गेल्यावर ओरडा अपेक्षित असतोच थोडा थोडा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पण प्रत्येक आईचं असतंच, वडील पण फोन करतात, पण दोघांचीही मदत होते, कधी कधी असं असतं की जमिनीवर ठेवायला, आई महत्त्वाची असते, म्हणजे ती खेचून घेते आम्हाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Pratik Rochkari : काम नेलं की फोनमध्ये तोंड खुपसतात, ओमराजेंनी पक्षांतर केलं तर… बड्या नेत्याने शिवबंधन सोडलं, ‘कमळ’ हाती

लग्नाच्या प्रश्नावरुन चिमटे

२३ तारखेला कोंढाण्याचं लग्न होणार आहे, रायबाचं लग्न कधी होणार? असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे, या सवालातून आदित्य ठाकरेंना विवाहावरुन अप्रत्यक्षपणे टोचण्यात आलं. त्यावर ‘चला वेळ झाली आता निघायची’ असं म्हणत त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं.

चार लाखांची बीएमडब्ल्यू कार

दरम्यान, तुमच्या प्रतिज्ञापत्रात बीएमडब्ल्यू कारची किंमत ४.२ लाख रुपये इतकी दिली आहे, ही गाडी कुठली असा अनेकांना प्रश्न पडल्याचं त्यांना सांगण्यात आलं. अरे १५ वर्ष झाली, त्याचं काय.. आधीच्या वेळीही होती.. तिचे डेप्रिसिएशन तर होतंच, असं आदित्य म्हणाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.