Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बोईसर विधानसभेत बविआसमोर मोठे आव्हान; सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण मारणार बाजी?

5

Boisar Assembly constituency : बहुजन विकास आघाडीला बोईसरची जागा टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. तर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचे व एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचे भवितव्य त्यांच्या मित्र पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
bhoisar

पालघर : जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मुख्य लढत बहुजन विकास आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात दिसून येत आहे. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीला बोईसरची जागा टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. तर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचे व एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचे भवितव्य त्यांच्या मित्र पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून असणार आहे.

पालघर आणि वसई तालुक्यात पसरलेल्या या मतदारसंघात एकूण ४ लाख ११ हजार मतदारसंख्या आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव पाड्यातील मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारांना आव्हानात्मक ठरत आहे. निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे काही तास उरले असून सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे. त्यामुळे या उरलेल्या काही तासांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात बविआचे राजेश पाटील, उद्धव ठाकरे गटाचे डॉक्टर विश्वास वळवी आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विलास तरे या तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष तसेच जिपकास पक्ष यांचे उमेदवार रिंगणात आहेत. येथील मतदान टक्केवारी विजयाचे समीकरण ठरणार आहे.
भरलेल्या बॅगा मातोश्रीत, रिकाम्या बॅगा बाहेर निघतात; ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन शिंदेंचा टोला
महायुतीचे उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोर येथे जाहीर सभा घेतली. मात्र सभेसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह दिसला नाही. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी मुख्यमंत्र्याच्या जाहीर सभेमध्ये सामील होण्याचे टाळल्याने महायुतीमधील वाद उघड झाला आहे. त्यामुळे हा बेबनाव मतदान संपेपर्यंत राहिल्यास वेगळे गणित निवडणुकीत दिसून येऊन त्याचे निकाली वेगळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MBBSच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे मृत्यू; तीन तास अघोरी शिक्षा, कॉलेजमध्ये खळबळ
पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व महायुतीचे जिल्ह्यातील नेते प्रकाश निकम यांनी विक्रमगड मतदारसंघातील महायुतीमधील भाजपचे अधिकृत उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्याविरोधात बंडखोरी केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण पालघर जिल्ह्यात आजही उमटत आहेत. तर पालघर विधानसभेचे व बोईसर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनुक्रमे जयेंद्र दुबळा व डॉ. विश्वास वळवी यांच्यासाठी बोईसर येथे प्रचारसभा घेतली असून बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर हे कॉर्नर मीटवर राजेश पाटील यांच्यासाठी भर देताना दिसून येत आहेत.
Maharashtra Election 2024: प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; उरले फक्त काही तास, छुप्या प्रचारावर करडी नजर
पाटील हे मात्र स्वतः प्रचारफेरीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदाराची थेट संपर्क साधत आहेत. त्याने मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा असून मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. हेमंत सावरा यांना १ लाख ०४ हजार ४३९ मतदान झाले होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.