Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी दहिसरमध्ये विधानसभा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी जे लोकांची फसवणूक करतील त्यांना जेलमध्ये टाकेन, असं म्हटलं.
Sharad Pawar : शिंदें पिता-पुत्राचा असा पराभव करा की, गद्दारीचं धाडस कोणी करणार नाही; माढ्यातून शरद पवार कडाडले
दहिसर क्षेत्रात जितकी पण विकासकामं विरोधकांनी रोखून ठेवली आहेत, ती कामं महायुती सरकार पुन्हा सुरू करेल. दहिसरमध्ये निवडणूक प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दहिसर विधानसभा क्षेत्रात मनिषाताईंनी ५ हजारहून अधिक पक्की घरं लोकांना दिली असल्याचं सांगितलं. जनतेची सेवा करणाऱ्या तीन प्रमुख आमदारांची नावं घेण्याची जेव्हा वेळ येते, त्यावेळी मनिषाताई चौधरी यांचं नाव पहिलं येतं.
बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती
मनिषा चौधरी यांनी करोनो काळात ठाकरेंच्या सरकारवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता, असंही फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, की ठाकरे गटाने कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जागी कंपाउंडरची नियुक्ती केली होती, त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याला पूर्णपणे ठाकरे गटाचे नेते जबाबदार असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
जनतेची फसवणूक करणाऱ्यांना जेलमध्ये टाकेन, फडणवीसांचा कोणाला टोला? भर सभेत म्हणाले…
लवकरच होणार थीम पार्क…
दहिसर चेक नाका परिसराजवळ एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवर लवकरच थीम पार्क तयार होणार आहे. मनिषा चौधरी यांच्या प्रयत्नांतून लवकरच हे थीम पार्क उभारण्यात येणार आहे, मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नांमुळेच येथील रडार दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, राज्यात विधानसभेची रणधुमाळी असून दोन दिवसांनी २० नोव्हेंबर रोजी मतदार पार पडणार आहे. त्यानंतप २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. प्रत्येक पक्षाकडून स्टार प्रचारक विधानसभेच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. अशात आता राज्यातील जनता कोणाला विजयी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.