Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यात प्रचारतोफा थंडावल्या; पुण्यासह राज्यभरात मतदानासाठी सज्जता, उद्या होणार मतदान

26

Maharashtra Assembly Election 2024: पुणे शहर-जिल्ह्यातील २१ मतदारसंघांसह संपूर्ण राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या (बुधवारी) सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान मतदान होणार असून, त्यानंतर राज्यात सत्ता कोणाची येणार, हे निश्चित करणारा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सvote AI 2
vote AI 2

पुणे : गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या तारखा जाहीर केल्या. ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत दिवाळीच्या वातावरणामुळे अर्ज माघारीनंतरच निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग चढला. सर्व राजकीय पक्षांचे देशातील प्रमुख नेते, राज्यातील वरिष्ठ नेते आणि इतर स्टार प्रचारकांच्या सभा, रोड-शो यामुळे गेल्या १५ दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, टीका-टिप्पणी आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसह जातीय-धार्मिक अशा विविध मुद्द्यांभोवती निवडणुकीचा प्रचार फिरत राहिला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेत ‘बारामती कोणाची’ हा सामना नणंद- भावजयीत रंगला होता, तर या नाट्याचा पुढचा अंक विधानसभेत काका-पुतण्या यांच्यात रंगतो आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बारामतीमध्ये एकमेकांवर टीका आणि आरोप करतच या नाट्याची सांगता केली.

मतदान प्रक्रिया गतिमान
पुणे :
निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्याचा अनुभव पाहता, विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया गतिमान करण्यात येणार आहे. मतदान केंद्रात एका वेळी चार जणांना प्रवेश दिला जाईल. तेथे तीन अधिकारी उपस्थित असल्याने प्रत्येक अधिकाऱ्याकडे एकेक मतदार जाईल. तेथे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चौथा मतदार थेट मतदान करू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. मतदार ओळखपत्र दाखवून ओळख पटवून देणे, स्वाक्षरी करणे, बोटांना शाई लावणे त्यानंतर थेट मतदान अशा चार टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्याकरिता तीन टप्प्यांवर अधिकारी उपस्थित असणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी २१ विधानसभा मतदारसंघात विविध संकल्पना राबविण्यात येणार आहे.
भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
मुस्लिमबहुल भागात मुस्लिम महिला ‘परदानशीन’ मतदारांची ओळख पटविण्यासाठी ९६ ठिकाणी सुविधा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी महिलावर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले, ‘मतदानाच्या दिवशी दोनशे मीटर अंतराच्या आत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांना बूथ लावता येणार नाही. दोनशे मीटर अंतराबाहेर बूथ लावण्यात आला; तरीही त्यांना त्यांच्या पक्षाचा झेंडा, फलक; तसेच चिन्हही लावता येणार नाही. मतदारचिठ्ठयांवर चिन्हही असणार नाही. मतदानाच्या पूर्वी ४८ तासांपर्यंत फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्सवर कोणत्याही राजकीय पक्षांना पोस्ट करता येणार नाही. जिल्ह्यातील निवडणुकीवर १६ सूक्ष्म निरीक्षक, एक पोलिस निरीक्षकांसह पाच खर्च निरीक्षक लक्ष ठेवून आहेत.’

दिव्यांग मतदारांसाठी सुविधा
दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यात तीन हजार ९९१ व्हीलचेअर्स, आठ हजार ४६२ मॅग्निफाइंग ग्लास; तसेच मदतीसाठी सहा हजार १०४ स्वंयसेवक उपलब्ध करून देणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, तळमजल्यावर मतदान केंद्र, स्वतंत्र रांग, दिशादर्शक फलक, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, ९२२६३६३००२ हा हेल्पलाइन क्रमांक आदी सुविधा देण्यात येणार आहेत.
कैलास गेहलोत अखेर भाजपमध्ये; ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच निर्णय
यादीत नाव असेल, तरच मतदानाची संधी
मतदार यादीत नाव नसले, तरी मतदान केंद्रावर जाऊन १७ क्रमाकांचा अर्ज भरल्यास मतदान करता येईल, अशी अफवा पसरविण्यात आली आहे. त्याबाबत ‘मतदानाच्या दिवशी कोणताही अर्ज भरून मतदान करता येणार नाही. मतदारयादीत मतदारांचे नाव असल्यासच त्यावेळी मतदान करता येईल,’ असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.

४० कोटींचा मुद्देमाल जप्त एका महिन्यादरम्यान स्थिर; तसेच ‘भरारी पथका’ मार्फत सुमारे ४० कोटी १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी १२ कोटी ११ लाख रुपयांची रोकडचा समावेश आहे. खेड-शिवापूरला जप्त केलेल्या पाच कोटींबाबत तपासणी सुरू आहे. नऊ कोटी ६३ लाख रुपयांचे मद्य, ६२ लाखांचे अमली पदार्थ, तसेच साहित्यांसह ४० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.