Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा… खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला खुली धमकी

4

Pratibha Dhanorkar Warora Constituency : खासदार म्हणून मी पाच वर्ष राहणार आहे, विरोध करणाऱ्यांचा लेखाजोखा घेणार अशी धमकीच वरोरा विधानसभा मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चंद्रपूर : काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठीमागे राहिला, तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार, असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून कुणबी समाजातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.
नांदेडमध्ये २५ वर्षानंतर एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान, चुरशीच्या लढतीत कोण ठरणार किंग?
वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा सोमवारी झाली. या सभेला खासदार धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना त्यांनी हा धमकीवजा इशारा दिला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Chitra Wagh : काँग्रेस सत्तेत आल्यास घरातील केवळ एकाच महिलेला लाभ, गृहलक्ष्मी योजनेवरुन चित्रा वाघ यांचे टीकास्त्र

काय म्हणाल्या प्रतिभा धानोरकर?

खासदार धानोरकर म्हणाल्या, ‘आज जे लोक माझा विरोध करत आहेत. माझ्या विरोधात बोलत आहेत. आत्ता मी कुणाला काहीही बोलणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात २८०० गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे. ही तर एक विधानसभा आहे. फक्त ३०० गावांची आहे. या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नाही. २० नोव्हेंबरला मतदान झाले की गावनिहाय यादी माझ्याकडे येईल. कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी या ठिकाणी करून आहे’, असा दमही त्यांनी दिला.

Baramati News : बारामतीत शरद पवारांना फुल्ल सपोर्ट; कृतज्ञतापूर्व लक्षवेधी फलकांची राज्यभरात चर्चा

Pratibha Dhanorkar : माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा… खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला खुली धमकी, व्हायरल व्हिडिओची चर्चा

या मतदारसंघात दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करत वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनिल यांना काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित होती. पण, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी जोर लावला. यावरून धानोरकर कुटुंबात फूट पडल्याचीही चर्चा आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.