Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shrinivas Pawar On Sharayu Toyota Raid : बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या शरयू टोयोटा कार्यालयाची तपासणी करण्यात आली. पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ती राजकारणावर भाष्य करत नाही, त्यामुळे… दादाच्या विरोधात फॉर्म भरु नको, या अजितदादांच्या विधानावर श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया
कार्यालयांच्या तपासणीबाबत श्रीनिवास यांची प्रतिक्रिया
रात्री इथे फक्त सुरक्षारक्षक असताना पाच-सहा अधिकारी आले. त्यांनी तपासणी केली. सुरक्षारक्षक व्हिडिओ चित्रीकरण करू लागला तेव्हा त्याला रोखले. आमच्या वकिलांनी मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी झाल्याचे सांगितले. पण तक्रार कोणाची होती, हे सांगितले नाही. यासंबंधी आम्हाला काही कल्पना नव्हती. इथे आम्ही व्यवसाय करतो. त्याचा रितसर कर भरला जातो. नटराज कलादालनाचीही तपासणी झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता, शरयू मोटर्स हे उमेदवाराशी संबंधित आहे, नटराज उमेदवाराशी संबंधित नाही. ठिक आहे, भाजपची ती नितीच आहे, पण आम्ही काही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, असे ते म्हणाले.
आईबद्दल काय म्हणाले श्रीनिवास पवार?
आई सध्या ८७ वर्षाची आहे. तिचा राजकारणासाठी वापर होतो याचे मला वाईट वाटते. ती त्यांची आई आहे तशी माझीही आई आहे. आईनेच ते पत्र लिहिले का? याबद्दल मला शंका आहे. आम्हाला कधी २०-२५ वर्षात पत्र लिहिले नाही. ते तिने लिहिले असेल का, तिची ट्रिटमेंट सुरु आहे. ती थांबवून तिला आठ दिवसांसाठी इथे आणले गेले. ठिक आहे, तिला ते २५ तारखेनंतर पुन्हा ट्रिटमेंटसाठी नेतील.
सोमवारच्या सभेत आई दिसली आणि आश्चर्य वाटले…
मी तर अशा परिस्थितीत तिला असा आग्रह केला नसता. मी तिला भेटलो होतो, तेव्हा ती मला म्हणाली की मी दमलीय रे, कंटाळली आहे या आजारपणाला. मला दोन पावले सुद्धा चालता येत नाहीत. तुला सभेला नेतील अशी विचारणाही मी केली होती, पण मी हलू शकणार नाही, असे ती म्हणाली होती. पण सोमवारच्या सभेत ती दिसल्याने मला आश्चर्य वाटले.
अजित पवारांसोबत असलेल्या बहिणींबाबत ते म्हणाले, माझे आणि मोठ्या बहिणीचे काही बोलणे झालेले नाही. आमची मोठी बहिण दादाचा व्यवसाय बघते. दादाच्या केसेस चालल्या आहेत, त्या ती बघते. तसंच निकालाबाबत, मतदारांबाबत बोलताना त्यांनी लोकसभेला जे झाले तेच परत करण्याची मतदारांची इच्छा दिसते आहे, असं सांगितलं.