Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली निवडणूक सज्जतेची पाहणी
सांगली, दि. 19 (माध्यम कक्ष) : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून या उत्सवात जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघातील 2 हजार 482 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे – 281-मिरज (अ.जा.) – 307, 282-सांगली – 315, 283-इस्लामपूर – 290, 284-शिराळा – 334, 285-पलूस-कडेगाव – 285, 286-खानापूर – 356, 287-तासगाव-कवठेमहांकाळ – 308, 288-जत – 287.
मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एस. टी. बसेस व अन्य वाहनांची सोय करण्यात आली असून या वाहनातून मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मतदान साहित्य वाटप केंद्रास संयुक्त भेट देऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व मतदान केंद्र सुसज्जतेची पाहणी केली. तसेच साहित्य वितरण व मतमोजणी कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे व श्रीनिवास अर्जुन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शामला खोत, सचिन पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
लोकशाहीच्या उत्सवात मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या अधिकारी कर्मचारी यांनी मतदान प्रक्रिया निर्भय, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मतदारसंख्या 25 लाखांच्यावर
या निवडणुकीत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील एकूण 25 लाख 36 हजार 65 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 82 हजार 276 पुरूष मतदार, 12 लाख 53 हजार 639 स्त्री मतदार तर इतर 150 मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा मतदारसंघनिहायनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे –
281-मिरज (अ.जा.) – पुरूष-171646, स्त्री-172198, इतर-32, एकूण 343876 मतदार.
282-सांगली – पुरूष-177693, स्त्री-178642, इतर-75, एकूण 356410 मतदार.
283-इस्लामपूर – पुरूष-141698, स्त्री-139152, इतर-6, एकूण 280856 मतदार.
284-शिराळा – पुरूष-156140, स्त्री-150869, इतर-3, एकूण 307012 मतदार.
285-पलुस-कडेगाव – पुरूष-146072, स्त्री-146786, इतर-8, एकूण 292866 मतदार.
286-खानापूर – पुरूष-177542, स्त्री-173435, इतर-19, एकूण 350996 मतदार.
287-तासगाव-कवठेमहांकाळ – पुरूष-159076, स्त्री-153606, इतर-4, एकूण 312686 मतदार.