Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु

5

Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आज सकाळी विरारमधील विवांता हॉटेलमध्ये धडकले. तिकडे तावडे उपस्थित होते. त्यांच्या बॅगांमध्ये पैसे आढळून आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तावडे ५ कोटी रुपये वाटायला आले होते, असा आरोप बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला.

विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटायला येणार असल्याची माहिती मला भाजपच्याच नेत्यांनी दिली होती, असा दावा करत ठाकूर यांनी खळबळ उडवून दिली. यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय व्यक्त केला. गृह खात्यानं पाळत ठेवून तावडेंना पद्धतशीरपणे यात अडकवलं, असं खासदार संजय राऊत म्हणाले. तावडेंसोबत आज घडलेला प्रकार पाहून भाजपच्या काही नेत्यांना आनंद झाला असेल, असं राऊतांनी म्हटलं.
सकाळी तावडेंना नडले, संध्याकाळी शिंदेंच्या नेत्याला चोपले; बविआचा पुन्हा त्याच हॉटेलात राडा
‘भाजपचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटताना पकडला जातो. विनोद तावडे भविष्यात डोईजड होतील या भीतीमधून ही कारवाई करण्यात आली. तावडे बहुजन समाजातून येतात. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला,’ असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. यामागे फडणवीसच असल्याचं त्यांनी सुचवलं.
Vinod Tawde: भाजपमधील कोणच्या नेत्यानं टिप दिली? तावडेंचा आवाज चढला; दोन वाक्यांत विषय संपवला
आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘विनोद तावडे विरारमध्ये केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे कोणताही पैसा, आक्षेपार्ह वस्तू सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झालेला आहे. उद्या होणारा पराभव दिसू लागल्यानं महाविकास आघाडीच्या इको सिस्टिमनं पराजय कव्हर करण्यासाठी कव्हर फायरिंग केलं आहे. या प्रकरणात विनोद तावडे कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कोणतेही पैसे नेले नाहीत, कुठलेही पैसे वाटले नाहीत. कोणतेही पैसे त्यांच्याकडे मिळालेले नाहीत,’ असं म्हणत फडणवीसांनी तावडेंना एकप्रकारे क्लीन चिट दिली.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.