Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vinod Tawde: मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अडचणीत आले आहेत. विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. त्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
विरारमध्ये नेमकं काय घडलं, याची सविस्तर माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली. ‘विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन आल्याचं मला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं. इतका मोठा केंद्रीय नेता अशाप्रकारे पैसे वाटायला येईल, असं मला वाटलं नाही. त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण दुर्दैवानं ते खरं ठरलं. हॉटेलमध्ये पैसे, डायऱ्या, लॅपटॉप पकडले गेले. डायऱ्यांवर नावं लिहिलेली आहेत. कोणाला किती K द्यायचे आहेत. K म्हणजे हजार. ३०० K, ४०० K म्हणजे ३ लाख, ४ लाख असे एकएका कार्यकर्त्याला देण्यात आले आहेत. तशी डायरीत नोंद आहे,’ असं ठाकूर यांनी सांगितलं.
Vinod Tawde: शिल्पा शर्मा ३००, टीना जैन ३००, पूर्णिमा पुजारी ३००; तावडेंकडे सापडलेल्या डायरीत कोणाची नावं?
‘१९ लाख रुपये सापडल्याचं मला समजलं. सकाळी एक मीटिंग त्यांच्याकडून (तावडेंकडून) घेण्यात आली. त्या बैठकीला २०० ते ३०० जण होते. त्यांना वाटप झालेलं असेल, त्यातले अनेक जण निघूनही गेले असतील,’ असं ठाकूर म्हणाले. ‘मतदानाच्या ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचा असतो असा नियम आहे. आता मतदानाला अवघे १२ तास राहिलेलं असताना विनोद तावडे इकडे काय करत होते?’, असा सवाल ठाकूर यांनी विचारला.
विनोद तावडे हॉटेलमधून बाहेर पडले. त्यावेळी वातावरण तणावपूर्ण होतं. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तावडे आधी स्वत:च्या कारमध्ये बसले. आसपास बविआच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. तावडे काही मिनिटांनंतर कारमधून उतरले. पुढे चालू लागले. काही मीटरवर हितेंद्र ठाकूर यांचे आमदारपुत्र क्षितीज यांची कार होती. तावडे त्या कारमध्ये बसले. त्यानंतर कार निघून गेली.
Vinod Tawde: भाजपच्याच लोकांकडून तावडेंची टिप! ठाकूरांचा सनसनाटी दावा; राऊतांनी नेत्याचं नाव सांगितलं
इतका गोंधळ, आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर तावडेंसोबत एकाच गाडीतून प्रवास कसा काय, असा प्रश्न ठाकूर यांना विचारण्यात आला. ‘हॉटेल बाहेर असलेल्या पोलीस प्रशासनानं मला विनंती केली की विनोद तावडेंना तुम्ही तुमच्या गाडीतून घेऊन निघा. कधी कोण करेल सांगता येत नाही. त्यामुळे मी त्यांना सोबत आणलं आणि त्यांना दुसऱ्या कारनं पाठवलं,’ असं ठाकूरांनी सांगितलं.
Vinod Tawde: तावडेंवर ५ कोटी वाटल्याचा आरोप, हितेंद्र ठाकूर भिडले; बॅगेतल्या डायऱ्यांमध्ये नेमकं काय?
‘विवांता हॉटेलजवळ लोक भडकले होते. राडा ही आपली संस्कृती नाही. पण लोकांचा संताप प्रचंड होता. त्यामुळे तावडेंना तिथून सुखरुप बाहेर काढण्याची जबाबदारीदेखील माझ्यावर आली. पोलीस प्रशासनानं मला म्हटलं, तुम्ही त्यांना इथून नेलंत तर बरं होईल. म्हणून आम्ही त्यांना तिथून घेऊन निघालो. कारण आमच्यात माणुसकी आहे,’ असं ठाकूर म्हणाले.