Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune Bhor ST News : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या बस निवडणूक कामासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे भोर आगारातील बससेवा दोन दिवस बंद राहणार आहे. याचा फटका शेकडो प्रवाशांना, विशेषत: ग्रामीण भागातील आणि आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना बसला आहे.
एसटी महामंडळाच्या भोर आगारातील बससेवा दोन दिवस बंद राहणार असल्याने शेकडो प्रवाशांचे हाल होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी ३५ बस दिल्यामुळे पुणे, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर, शिरवळ, नीरा, लोणंद आहे. भोर स्थानकातून दररोज स्वारगेट-पुणे मार्गावर बसच्या ४० ते फेऱ्या होतात. तसेच इतर ठिकाणी शंभर फेऱ्या होतात. मात्र, निवडणूक कामासाठी बस दिल्याने येथील सर्व व्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागातून भोरमध्ये येणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहेत. मंगळवारी आठवडे बाजार असल्याने आणि त्यातच, बस बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल झाले.
66 निवडणूक निर्णय सूचनेनुसार भोर आगारात उपलब्ध असलेल्या सर्व ३५ बस दिल्यामुळे प्रवासी वाहतूक बंद आहे. राखीव दोन बसमधून स्वारगेट आणि शिरवळ मार्गावर काही फेऱ्या झाल्या असल्याचं भोर आगाराचेस हायक वाहतूक अधीक्षक प्रदीप इंगवले यांनी सांगितलं.
दरम्यान, आगारात सध्या फक्त दोन राखीव बस आहेत. त्यातून शिरवळ मार्गावर दिवसभरात चार फेऱ्या आणि भोर-स्वारगेट अशी एक फेरी झाली. स्थानकात ‘विधानसभा निवडणूक असल्याने १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारची प्रवाशी वाहतूक बंद राहील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी,’ अशी सूचना लिहिली आहे.