Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून नागरिकांनी उत्साह दाखवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. जामखेडमधील नान्नज येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त नव्हता आणि काही ईव्हीएम मशीनवर त्यांच्या आणि त्यांच्या विरोधकांच्या नावासमोर काळा डाग आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी ते काही आरोप करताना दिसले आहेत. रोहित पवार म्हणाले की, मी आज सकाळी नान्नज बुथवर गेलो होतो. नान्नज हे गाव जामखेड तालुक्यात येते. तिथे कोणीही पोलिस केंद्रावर नव्हते, गेटवरही कोणी नव्हते. आतमध्ये गाड्या घेऊन लोक येत होते. पावणे सात वाजले तरीही तिथे कोणी नव्हते. खरे तर अधिकारी मतदान केंद्रावर सहालाच येतात. मशीन चेक केल्या जातात.Vidhan Sabha Big Fights : कुठे काका-पुतण्या, कुठे गुरु शिष्य आमनेसामने; महाराष्ट्रातील ७५ बिग फाईट्सकडे महाराष्ट्राचं लक्ष, वाचा यादीयासोबतच गंभीर आरोप करत रोहित पवार यांनी म्हटले की, काही EVM मशीनवर माझ्या विरोधकांच्या आणि माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढे काळा डाग लावल्याचेही निदर्शनास आले आहे. हा सर्व रडीचा डाव आहे. हा काळा डाग हटवण्याची मागणी तेथील बुथ प्रमुखाकडे करण्यात आली. तसेच आमच्या मागणीनुसार मतदारसंघात संवेदनशील ठिकाणच्या बुथवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून गरज पडल्यास हे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवू शकतो.
त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे कायम सुरु राहतील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, ही विनंती. आता रोहित पवार यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओच्याही माध्यमातून मतदान केंद्रावरील परिस्थितीचा आढावा रोहित पवार यांच्याकडून घेण्यात आलाय. रोहित पवार हे शरद पवार गटाकडून ही निवडणूक लढत आहेत. जोरदार प्रचार आपल्या मतदार संघात रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला.