Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ गावात अद्याप एकही मतदान नाही, नेमकं काय कारण?

4

No Votes in Ramnagar Village in Chhatrapati Sambhaji Nagar District: राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र महाराष्ट्रातील एका गावात अजुन एकही मतदान झालेले नाही. नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानप्रक्रियेला सुरूवात झाली असून मतदान केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांबा लागलेल्या दिसत आहेत. सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामध्ये एका गावामध्ये अजून एकही मतदान झालेले नाही. नेमकं काय कारण जाणून घ्या.

मतदान सुरू झाल्यापासून आता ४ ते ५ तास झाले आहेत. मात्र कन्नड तालुक्यामधील रामनगरमध्ये अजूनही मतदानाला सुरूवात झालेली नाही. रामनगरवासियांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकला आहे. १४६६ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. स्मशानभूमीच्या प्रलंबित मागणीसाठी गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता त्यांची समजूत काढण्यासाठी कोणं जातं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी एक-एक मत महत्वाचं असतं. जवळपास १५०० गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटक उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक १२.३३ मतदान हे गडचिरोलीमध्ये तर सर्वात कमी मतदान हे धाराशिव येथे ४.८५ ट इतके झाले आहे.

राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव – ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के, लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के, नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के, रायगड – ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के, सांगली – ६.१४ टक्के,सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के, सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा – ५.९३ टक्के, वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.