Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nashik Nandgaon Sameer Bhujbal and Suhas Kande Fight: सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला.
हायलाइट्स:
- आज तुझा मर्डर फिक्स आहे!
- सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी
- नाशिकचं राजकारण तापलं; कारण…
चला, मतदान करुया! नाशिकमध्ये आज १९६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला.
आज १९६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
दरम्यान, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याचा कौल देणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभर मतदान होत आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असून, १९६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. यंदा किमान ७५ टक्के मतदान व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज झाली असून, भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.