Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
NCP SP Karale Master Attacked in Wardha: विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक निलेश कराळे यांना मारहाण झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे.
निलेश कराळे उर्फ कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. आपल्या गावातून मतदान करुन परतल्यावर हा प्रकार घडल्याचं कराळे मास्तरांनी सांगितलं. ‘मी माझ्या गावावरुन मतदान करुन आलो. त्यानंतर वर्धा मतदारसंघात फिरण्यासाठी निघालो. यावेळी कुटुंब सोबत होतं. उमरी गावातून माझा नेहमीचा येण्याचा जाण्याचा रस्ता आहे. तिकडे मी थांबलो. आमच्या बूथवर असलेल्या कार्यकर्त्यांकडे विचारपूस केली. तेव्हा तिथे जवळच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली,’ असं कराळे मास्तरांनी सांगितलं.
‘मी आमच्या बूथवरील कार्यकर्त्यांशी बोलत होतो. काही वेळापूर्वीच पोलिसांची एक गाडी तिथे येऊन गेली होती असं त्यांनी सांगितलं. तुमच्या बूथवर दोनच खुर्च्या ठेवा, अशी सूचना पोलिसांनी केली होती. पण शेजारीच आमदार पंकज भोयर यांचा बूथ होता. त्यावर ८ जण होते. त्यात ग्राम पंचायतीचे कर्मचारीदेखील होते. ते कर्मचारी लॅपटॉप घेऊन बसले होते. मी पोलिसांना त्यासाठी कॉल केले. त्यावर पोलीस आम्ही तिथे येतो म्हणाले’, असा घटनाक्रम मास्तरांनी कथन केला.
‘भोयर यांच्या बूथवर ग्राम पंचायतीचा कर्मचारी होता. त्याला याबद्दल विचारणा करण्यासाठी मी दोन पावलं पुढे गेलो. तेव्हा उंबरी गावचा भाजपचा उपसरपंच सचिन खोसे माझ्या अंगावर धावून आला. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे. त्याच्यावर अनेक केसेस आहेत. तो काहीच न बोलता थेट माझ्या अंगावर आला. त्यानं मारहाण सुरु केली. माझी पत्नी दीड वर्षांच्या लेकीला घेऊन तिथेच होती. तिलाही त्यानं शिवीगाळ केली. तिलादेखील मारलं. माझी दीड वर्षांची लेक पडणार होती. सुदैवानं तिला काही झालं नाही,’ असं कराळेंनी सांगितलं.