Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार? EXIT POLL थोड्याच वेळात; हरियाणा प्रमाणे फुसका बार ठरणार की…; २०१९ मध्ये पाहा काय झालं
Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Result Prediction: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. मतदान झाल्यानंतर काही वेळातच एक्झिट पोल समोर येतील. यात राज्यात कोणाला सत्ता मिळले याचा अंदाज वर्तवला जाईल.
हरियाणा विधानसभेसाठी झालेल्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये सर्वांनी काँग्रेसला १० वर्षानंतर राज्याच मोठे यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. जवळ जवळ सर्वच संस्थांनी काँग्रेसला ९० पैकी ६० ते ६५ जागा मिळतील असे म्हटले होते. तर भाजपला २५ ते २८ जागा मिळतील असे सांगितले होते. प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल उटला लागला. भाजपला ४८ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर एक्झिट पोलच्या विश्वसनियतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले. लोकसभा निवडणुकीत देखील अशीच अवस्था झाली होती.
राज्यात पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील एक्झिट पोल फार काही कमाल करू शकले नाहीत. एक दोन संस्था वगळता सर्वांनी भाजप आणि शिवसेनेला मोठे बहुमत मिळेल असे म्हटले होते. मात्र तो अंदाज चुकीचा ठरला होता. २०१९मध्ये एक्झिट पोलमध्ये युतीला स्पष्ट बहुमत मिळले असे म्हटले होते. जो अंदाज बरोबर होता. मात्र आकडेवारीचा अंदाज चुकीचा ठरला होता. आता राज्यात २३ तारखेला निकाल जाहीर होतील तेव्हा पुन्हा एकदा एक्झिट पोलचा निकाल देखील समोर येईल.
२०१९च्या एक्झिट पोलमध्ये अॅक्सेस माय इंडियाने भाजप-शिवसेना युतीला १६६ ते १९४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. या सर्व्हेत काँग्रेस-राष्ट्रवादीला ८६ जागा, तर अन्यला ८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. सी व्होटरने युतीला १८२ ते २०६ जागा, आघाडीला ७२ ते ९८ जागा मिळतील असे म्हटले होते. जन की बात सर्व्हेमध्ये युतीला २४३ तर आघाडीला ५२ ते ५९ जागा असा अंदाज वर्तवला होता. टाईम्स नाऊच्या मते युतीला २३० तर आघाडीला ४८ जागांचा अंदाज वर्तवला होता.