Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नांदेडात मतदारांना डांबल्याचा मोठा आरोप; चव्हाणांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले, ‘आमची विजयाकडे घोडदौड…’
Ashok Chavan Reacted on Congress allegations: नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे भाजपने मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आले आहे. यावर खासदार अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून यंदा रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून पप्पू कोंडेकर रिंगणात आहेत. काँग्रेसशी फारकत भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांनी आपल्या कन्येला राजकारणात उतरवण्याची संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर काँग्रेसच्या कोंडेकर यांनीही त्यांना तगडी फाईट दिली आहे. यामुळे या मतदारसंघाची संपूर्ण राज्यभरात चर्चा आहे. यातच आज मतदानाच्या दिवशी व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादंग निर्माण झाला आहे. Maharashtra Election Exit Poll: शिंदे, ठाकरे सामना बरोबरीत; दादांची घसरगुंडी, पवारांमुळे मविआची मुसंडी; एक्झिट पोल आला
या सर्व प्रकारावर खासदार अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सकाळपासून आमची विजयाकडे घोडदौड होती, पराभव दिसल्याने असे आरोप काँग्रेसकडून केले जात आहेत. उलट मतदान केंद्रात घुसून त्या मतदारांना आपल्या बाजूने मतदान करण्याकरिता प्रयत्न केला गेला, त्याची दखल पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे, आम्ही सीसीटीव्ही फुटेज देखील मागवलेले आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.