Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Man Died While Voting In Satara : मतदान करुन झाल्यानंतर एका व्यक्तीचा मतदान केंद्रातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती अशी की, राज्यात लोकशाहीचा महोत्सव सुरू असताना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथे हृदयद्रावक घटना घडली. शाम नानासाहेब धायगुडे हे मोर्वे येथील मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी नावाची चिठ्ठी देऊन ओळखपत्र दाखवून बोटाला शाई लावली. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली. वोटिंग बटन दाबले आणि बीप मशीनचा आवाज येण्याच्या अगोदरच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले.मतदान करताना फोटो-व्हिडिओ काढले, बूथ अधिकाऱ्याने पाहिल्यानंतर प्रकरण अंगलट; वाशिममध्ये एकावर गुन्हा दाखल
यावेळी तेथील उपस्थित अधिकारी आणि गावचे पोलीस पाटील यांनी खाली कोसळलेल्या शाम धायगुडे यांना ताबडतोब तिथे असलेल्या खाजगी वाहनातून लोणंद येथे उपचारासाठी हलवले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोर्वे गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी पाच वाजता धायगुडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात ही दुःखाची घटना घडली असतानाही गावातील नागरिकांनी या लोकशाहीच्या महोत्सवात सामील होत गावातील नागरिकांनी ७१ टक्के मतदान केले. शिवाय धायगुडे यांच्या कुटुंबातीलही लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. इतक्या दुःखद घटनेनंतरही धायगुडे कुटुंबीयांनी आपले मतदानाचे कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे.Raigad News : मतदानाच्या दिवशी भररस्त्यात घडला भानामतीचा प्रकार; पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम
Satara News : बोटाला शाई लावली, वोटिंग बटन दाबले आणि… मतदान केंद्रातच मृत्यू, काय घडलं?
शाम धायगुडे हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांचे शिक्षण एमकॉम झाले होते. हे सदैव निर्व्यसनी राहिले होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.