Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जरांगे फॅक्टर फेल? मराठ्यांचा कौल कुणाला? एक्झिट पोलमधून सगळंच समोर आलं

5

Maharashtra Vidhan Sabha Jarange Factor: महाराष्ट्रात सरकार कोणाचे याचा फैसला आता मतदारांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या पार्श्वभूमीमुळे ही निवडणूक बहुचर्चित ठरली. यातच लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जरांगे फॅ्क्टर काम करणार असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे होते, ते एक्झिट पोलच्या अंदाजानुसार खोटे ठरताना दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पार पडला आहे. महाराष्ट्रात सरकार कोणाचे याचा फैसला आता मतदारांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या पार्श्वभूमीमुळे ही निवडणूक बहुचर्चित ठरली. असे असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मात्र पक्षफुटीसाठी कारणीभूत ठरवला जाणारा भाजप पक्षच सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला राज्यात ७७ ते १०८ जागा, शिवसेना शिंदे गटाला २७ ते ५० तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १८ ते २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला एकत्रितपणे १२२ ते १८६ जागांवर बाजी मारणार असल्याचं एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. तर दुसरीकडे मविआमध्ये काँग्रेसला २८ ते ४७, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला १६ ते ३५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २५ ते ३९ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.

तर पोल्स ऑफ पोलच्या अंदाजानुसार महायुतीच राज्यात सरकार स्थापन करणार असे चित्र आहे. आकडेवारीनुसार राज्यात महायुतीला १५५ जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला १२२ जागांवर समाधान मानावे लागेल. २८८ पैकी ११ जागा या अन्यला मिळतील असे चित्र आहे.
Maharashtra Exit Polls Highlights: महाराष्ट्रात पुन्हा भाजपच! एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात? मविआला धक्का
दरम्यान, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीदरम्यान जरांगे फॅक्टर निर्णायक ठरु शकतो असे चित्र निर्माण झाले होते. परंतु ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले होते. तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील निर्माण झाला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. या सर्व गोष्टींचा भाजपला निवडणुकीत फटका बसणार असे मानले जात होते. परंतु एक्झिट पोलच्या आकडेवारीने हे खोटे ठरवले आहे. राज्यात महायुतीच्या पारडं जड होणार असल्याचे अंदाज आहेत. आणि भाजपच पुन्हा मोठा पक्ष ठरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टरचा प्रभाव विधानसभा निवडणूकीत काम करणार नसल्याचे हे अंदाज सांगत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेताना तेव्हा त्यांनी आपला कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले होते. मराठा बांधवांनी ज्यांना वाटेल त्यांना मतदान करावे, मात्र आरक्षण डोक्यात ठेवा, असेही खडसावून सांगितले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.