Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Election Officials Attacked In Nagpur : नागपुरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या निवडणूक कर्माचाऱ्यांवर तलवार तसंच चाकूने हल्ला करण्यात आला.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बूथ क्रमांक २६८ मधील मतदान कर्मचारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन घेऊन स्ट्राँग रूममध्ये जात होते. तेथून कर्मचारी निघाले असता अचानक त्याच्यावर अज्ञात तरुणांनी तलवारी आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कार चालकाला हातावर तलवार लागल्याने तो जखमी झाला आहे.
या घटनेनंतर मध्य नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके हे त्यांच्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप आहे. यादरम्यान काँग्रेस समर्थकांकडून वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. भाजपचे उमेदवार प्रवीण दटके हे सुद्धा त्यांच्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले.Maharashtra Exit Polls Highlights: महाराष्ट्रात पुन्हा भाजपच! एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात? मविआला धक्का
भाजप – काँग्रेसमध्ये राडा
यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. जिथे काँग्रेस कार्यकर्त्यांनीही धक्काबुक्की आणि मारहाण केली. यादरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यात ईव्हीएम घेऊन जाणारा चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मतदान करताना फोटो-व्हिडिओ काढले, बूथ अधिकाऱ्याने पाहिल्यानंतर प्रकरण अंगलट; वाशिममध्ये एकावर गुन्हा दाखल
Nagpur News : नागपुरात गोंधळ, निवडणूक अधिकाऱ्यांवर अज्ञातांकडून तलवारी आणि चाकू हल्ला; ईव्हीएम लुटण्याचा प्रयत्न
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ईव्हीएम मशीन आणि वाहनात उपस्थित असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. क्षतिग्रस्त झालेले वाहन कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तर ईव्हीएम आणि कर्मचारी यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना तेथून हटवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.