Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election: अखेरच्या तासांतील मते निर्णायक; लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत किंचित थंड प्रतिसाद
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील शहर आणि उपनगर या जिल्ह्यांचा मतटक्का मात्र काहीसा समाधानकारक असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात ५१.३६ टक्के मतदान झाले होते. तेच बुधवारी शहरात पाच वाजेपर्यंत ४९.०७ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर (एनडीए) इंडिया आघाडीने आव्हान उभे केले होते. निकालानंतर देशात एनडीएने पुन्हा एकदा सरकार बनविण्यापुरते संख्याबळ जमवले, परंतु महाराष्ट्रात इंडिया आघाडीने बाजी मारली होती. राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागा इंडिया आघाडीने पटकावल्या होत्या. संविधान बदलाचा प्रचार झाल्याने मतदानावेळी मतटक्का वाढून राज्यातील ६६ टक्के मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले होते.
लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतटक्क्याचा धसका घेत राज्यातील महायुती सरकारने नवनवीन योजना आखल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणत सर्व जातीधर्मातील महिलांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तसेच महायुती सरकारने लोकांसाठी जाहीर केलेल्या योजनांची आक्रमक प्रसिद्धीही केली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागात शेतमालाचा भाव या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले. मुंबईत धारावी पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात ६६ टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत अखेरच्या तासात किती मतदान होते, यावर राज्याचे भवितव्य ठरणार आहे. राज्यात मतटक्का वधारला! विधानसभेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य मतदानपेटीत बंद
मुंबईतील शहर आणि उपनगर या जिल्ह्यांचा मतटक्का मात्र काहीसा समाधानकारक असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात ५१.३६ टक्के मतदान झाले होते. तेच बुधवारी शहरात पाच वाजेपर्यंत ४९.०७ टक्के मतदान नोंदविण्यात आले. उपनगरात लोकसभेदरम्यान ५४.९६ टक्के मतदान झाले होते, तर बुधवारी सायंकाळी पाच वाजपर्यंत ५१.७६ टक्के मतदान झाले. मतदानाच्या उरलेल्या एका तासात मुंबई शहर आणि उपनगर लोकसभेची मतदानाची टक्केवारी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतटक्क्याचा लाभ महायुतीला होणार की महाविकास आघाडीला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६३ टक्के मतदान; वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा
मागील काही वर्षांचा मतटक्का
लोकसभा निवडणूक २०१९
महाराष्ट्र ५९ टक्के
विधानसभा निवडणूक २०१९
महाराष्ट्र ६१.४४ टक्के
मुंबई शहर ४८.६३ टक्के
मुंबई उपनगर ५१.१७ टक्के
————–
लोकसभा २०२४
महाराष्ट्र ६६ टक्के
मुंबई शहर ५१.३६ टक्के
मुंबई उपनगर ५४.९६ टक्के
विधानसभा निवडणूक २०२४ (रात्री ११ वाजेपर्यंत)
महाराष्ट्र ६४.६३ टक्के
मुंबई शहर ५२.०७ टक्के
मुंबई उपनगर ५५.७७ टक्के