Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Guru Pushya Yog 2024 Upay : गुरुपुष्यामृत योगावर करा धनवृद्धीसाठी उपाय! उत्पन्नात होईल वाढ, सुख-समृद्धीत नांदेल
Guru Pushya Yog 2024 Importance : २१ नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. यंदा हा २०२४ मधील शेवटचा योग असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यानंतर गुरुपुष्य योग तयार होतो. गुरु आणि पुष्य नक्षत्र हे दोन्ही ज्ञान, सौभाग्य, समृद्धी, संपत्ती इत्यादींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दोघांच्या संयोगाने तयार होणारा योग अत्यंत शुभ मानला जातो.
२१ नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. यंदा हा २०२४ मधील शेवटचा योग असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यानंतर गुरुपुष्य योग तयार होतो. गुरु आणि पुष्य नक्षत्र हे दोन्ही ज्ञान, सौभाग्य, समृद्धी, संपत्ती इत्यादींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दोघांच्या संयोगाने तयार होणारा योग अत्यंत शुभ मानला जातो.
या योगात केलेले शुभ कार्य नेहमीच यशस्वी होतात. गुरुपुष्य योगासोबतच सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. जो अत्यंत शुभ मानला जातो. या योगामध्ये काही ज्योतिष्यांचे उपाय केल्याने जीवनात काही गोष्टींची कमतरता भासणार नाही. गुरुपुष्य योगात कोणते उपाय केल्याने धनसंपत्ती वाढ होते जाणून घेऊया.
गुरुपुष्य योग महत्त्व
पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला २७ नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. पुष्य नक्षत्रांच्या क्रमाने ८ व्या स्थानावर येते. पुष्य नक्षत्र कर्क राशीत येते, ज्याचा स्वामी चंद्र आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ आणि लाभदायक मानले जाते. याचा देवता गुरु आणि स्वामी शनि आहे. जर कुंडलीत गुरु दोष निर्माण झाला असेल तर त्याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी गुरु पुष्य योगाचा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेळ पाहिली जात नाही. गुरुपुष्य योगात जमीन, मालमत्ता, दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.
नोकरी आणि व्यवसाय उन्नतीसाठी उपाय
गुरु पुष्य योगाच्या दिवशी देवी पारद लक्ष्मीसोबत एकाक्षी नारळाची पूजा करावी. तसेच गाईला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. नोकरी- व्यवसायातील समस्या दूर होतात. संपत्तीत वाढ होते. या दिवशी पूजेत वापरला जाणारा नारळ लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवावा. यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते तसेच पारद लक्ष्मीची पूजा करा.
रखडलेले पैसे मिळविण्यासाठी
अनेकदा रखडलेले पैसे लवकर मिळत नाही अशा वेळी काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर कुंक आणि हळद लावून स्वस्तिक बनवा. दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा. धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणावर्ती शंखपूजन केल्याने भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अडकलेले पैसे मिळतात.
दारिद्रय दूर करण्यासाठी उपाय
गुरुपुष्य योगाच्या दिवशी चांदीचा चौकोनी तुकडा विकत घेऊन घरी आणा. चौकोनी तुकड्याची देवी लक्ष्मीसोबत पूजा करा. पूजेच्या वेळी लक्ष्मीच्या चरणी गुलाबाची फुले, पाण्यासोबत नारळ आणि सात गोवऱ्या अर्पण करा. त्यानंतर मध्यरात्रीनंतर या गोवऱ्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवाव्यात आणि चांदीचा चौकोनी तुकडा नेहमी सोबत ठेवावा. असे केल्याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि गरिबी दूर होते.
धनलाभासाठी उपाय
गुरुपुष्य योगाच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणून लाल कपड्यावर ठेवा. त्यावर कच्चे दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करुन देवी लक्ष्मीजवळ ठेवा. यानंतर देवी लक्ष्मीसोबत श्रीयंत्राला हळदी-कुंकू लावून साखर अर्पण करा. त्यानंतर २१ वेळा श्रीसूक्ताचे पठण करा. कमलगट्टाच्या जपमाळाच्या मदतीने लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची संपत्ती वाढेल. मान-सन्मानासह सौभाग्य वाढेल.
गुरुपुष्यामृत योगात हा उपाय करा
गुरुपुष्य योगामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यानंतर केशर असलेली खीर अर्पण करा. यादिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यानंतर खीर सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. असे केल्याने जीवनातील तणाव संपेल आणि संपत्ती वाढेल.