Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nazar Dosh Upay Marathi : मुले सारखी रडतात, चिडचिड करतात? असू शकतो वाईट नजरेचा प्रभाव, हे सोपे उपाय करुन पाहा!
Remedy for evil eye : लहान मुल घरात जन्माला आले की, त्याच्या हसण्या रडण्याने आनंदाचे वातावरण सगळीकडे तयार होते. आपल्या बाळाला पाहण्यासाठी घरातील अनेक कुटुंब मंडळी किंवा नातेवाईक येत असतात. अशावेळी बरेचदा त्यांच्यासोबत नकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते. हसणारे-खेळणारे बाळ अचानक रडू लागते. ते अचानक का रडू लागले आहे याविषयी मात्र आपल्या कोणालाही काही कळत नाही. जाणून घेऊया मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी कोणते उपाय करायला हवे.
Buri Nazar Upay :
लहान मुल घरात जन्माला आले की, त्याच्या हसण्या रडण्याने आनंदाचे वातावरण सगळीकडे तयार होते. आपल्या बाळाला पाहण्यासाठी घरातील अनेक कुटुंब मंडळी किंवा नातेवाईक येत असतात. अशावेळी बरेचदा त्यांच्यासोबत नकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते. हसणारे-खेळणारे बाळ अचानक रडू लागते. ते अचानक का रडू लागले आहे याविषयी मात्र आपल्या कोणालाही काही कळत नाही.
‘बुरी नजर वाले तेरा मुँह काला’ पूर्वीच्या काळी आपली आई- आज्जी सांगायची बाळ रडू लागले की, त्याला कुणाची तरी नजर लागली आहे. परंतु, या वाईट नजरेपासून बाळाचे रक्षण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जात असते. वाढत्या तंत्रज्ञानानुसार हल्ली या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे देखील तितकेच कठीण आहे.
वाईट नजरेचा परिणाम लहान बाळावर सर्वात जास्त होतो. त्यामुळे मुले सतत रडरड किंवा चिडचिड करतात. ज्योतिषशास्त्रानसार मुलाच्या कुंडतील चंद्राची स्थिती कमजोर असेल तर त्यांना दृष्टीदोषांमुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. मुलांना नजरेचा देखील त्रास असतो. जाणून घेऊया मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी कोणते उपाय करायला हवे.
वाईट नजरेपासून लहान बाळाला टाळण्यासाठी उपाय
- जर तुमचे बाळ सतत उदास, चिडचिड किंवा रडत असेल. तर वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले टाका. मुलाच्या डोक्यावरुन ११ किंवा ७ वेळा उतरवा. हे पाणी बाहेर फेकून द्या.
- चिमूटभर मीठ मुलाच्या डोक्यावरुन सात वेळा उतरवावे. हे मीठ बेसिंग किंवा पाण्यात टाकून फेकून द्यावे.
- सुक्या मिरच्या, मोहरीचे दाने मुलांच्या डोक्यावरुन उतरवावे. बाहेर कुठेतरी नेऊन हे जाळा. याचा ठसका झाला किंवा घाण वास येत असेल तर बाळाला नजर झाली असे समजावे.
- जर मुलांना सतत वाईट नजरेचा त्रास होत असेल तर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन मूर्तीच्या खांद्यावरील शेंदूर बाळाच्या कपाळावर लावावा. असे केल्याने नजरदोष दूर होतो.
- वाईट नजरेमुळे बाळाचा विकास पुरेपूर होत नाही. अशावेळी बाळाच्या डोक्यावरुन तुरटी आणि मोहरी सात वेळा उतरवून गॅसवर जाळा. यामुळे बाळाचा नजरदोष दूर होतो.
टीप – सदर माहिती सामान्य आहे, उपाय करताना सल्ला घ्यावा. महाराष्ट्र टाइम याविषयी कोणतीही पुष्टी करत नाही.