Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मतांचा टक्का वाढला, वाशिम जिल्ह्यात उमेदवारांना धक्का बसला; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

6

Washim Political News: २०१९च्या निवडणुकीत ६७.०५ टक्के मतदान झालं होतं. मात्र, यावेळी १.०९ टक्याने मतदान वाढलं असून गेल्या निवडणुकीत दुरंगी झालेली लढत भावना गवळींच्या एन्ट्रीने तिरंगी झालेल्या लढतीत मतदाराने कोणाला कल दिला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हायलाइट्स:

  • वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात कांटे की टक्कर
  • कुठे दुरंगी तर कुठे चौरंगी लढत
  • ६२ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रामध्ये कैद
Lipi
वाशिम विधानसभा निवडणूक टक्केवारी

पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया पार पडली असून २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी ६६.४६ टक्के मतदान झालं. यामध्ये सर्वाधिक रिसोड विधानसभा मतदार संघात ६८.१४ टक्के, त्याखालोखाल कारंजा विधानसभा मतदार संघात ६५.४३ टक्के मतदान झालं आहे. वाशिम मतदार संघात सर्वात कमी ६४.६५ टक्के मतदान झालं. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत तिनही विधानसभा मतदार संघातील ६२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये कैद झालं आहे. वाशिम जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सलग पाचवेळा शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान विधानपरिषद सदस्य भावना गवळी यांनी पहिल्यांदाच रिसोड विधानसभा निवडणूक लढल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष रिसोड विधानसभा मतदार संघाकडे लागून आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. इथे झनक घराण्याचं वर्चस्व आहे. काँग्रसचे अमित झनक इथे सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी या निवडणुकीत देखील बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. तर भावना गवळी यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने या मतदार संघात चुरशीची लढत झाली.
Karuna Munde : हॉटेल बूक असतं… प्राजक्ता माळी, स्वातिका शिरोडकर, मोनिका यांच्यासारख्या… करुणा मुंडेंचे घणाघाती आरोप

२०१९च्या निवडणुकीत ६७.०५ टक्के मतदान झालं होतं. मात्र, यावेळी १.०९ टक्याने मतदान वाढलं असून गेल्या निवडणुकीत दुरंगी झालेली लढत भावना गवळींच्या एन्ट्रीने तिरंगी झालेल्या लढतीत मतदाराने कोणाला कल दिला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कारंजा विधानसभा मतदार संघात जवळपास ४ टक्याने मतदानात वाढ झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ६१.७७ मतदान झालं होतं. तर या निवडणुकीत ६५.४३ मतदान झालं. या मतदारसंघात चार माजी आमदारांचे वारस पक्षांतर करून एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे होते. भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ग्यायक पाटणी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाकडून उभे होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी भाजपकडून निवडणूक लढली. दिवंगत माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र सुनील धाबेकर यांनी वेळेवर वंचितकडून निवडणूक लढली तर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आणि माजी राष्ट्रवादीचे माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र ययाती नाईक यांनी समनक जनता पार्टीकडून निवडणूक लढली. तर राष्ट्रवादी काँग्रेस(अ.प.) पक्षाचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढल्याने इथ पक्षांतराची खिचडी होऊन पंचरंगी निवडणूक झाली.

बंजारा समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान असलेल्या या मतदारसंघात मात्र महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. या मतदारसंघात सुद्धा जवळपास ५ टक्यांनी मतदान वाढलं आहे. वंचित बहुजन आघाडीतून शिवसेनेत गेलेले डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी या मतदार संघात वंचित फॅक्टर मोडीत काढल्याची चर्चा आहे. भाजपविरुद्ध शिवसेना आणि शेवटी जातीपातीवर आलेल्या राजकीय परिस्थितीत भाजपचे श्याम खोडे किंवा शिवसेनेचे डॉ. सिध्दार्थ देवळे या दोघांतून एकाचा निसटता विजय होऊ शकतो. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून यात कुणाचा गुलाल उधळणार हे येत्या २३ तारखेला कळणार आहे.
Satara Talathi Accident: दोन महिन्यांपूर्वी नोकरी, इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाची झडप, तरुण तलाठ्याचा अपघाती अंत

अंदाजित अंतिम आकडेवारी

वाशिम: 2024:- 64.65%
मागील :2019:-59.19%

रिसोड: 2024:- 68.14%
मागील 2019:- 67.05%

कारंजा: 2024:- 65.43%
मागील :2019:- 61.77

जिल्ह्यात 2024:- 66.06
मागील 2019 :- 62.67%

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.