Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चाकरमानी बस भरुन तळकोकणात, मतदानाचा टक्का वाढला, कुणाला धक्का, कुणाला बुक्का?

5

Maharashtra Election Voting Percentage : तळकोकणात यावेळी मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 71.11% मतदान झाले.

Lipi

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात बुधवारी तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवली होती. यामुळे मतदारांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. वृद्ध नागरिकांसह, जखमी व्यक्तींनीही मतदानाचा हक्क बजावला. मिळेल त्या वाहनाने चाकरमानी देखील मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. दुपारनंतर संध्याकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा मतदान केंद्रावर लागलेल्या पाहायला मिळत होत्या.

कणकवलीत काय?

तळकोकणात यावेळी मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली असून जिल्ह्यात 71.11% मतदान झाले. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये 69.55% एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी मतदारांची मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळाली. या मतदारसंघामध्ये गेले दोन टर्म नितेश राणे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. महायुतीचे उमेदवार नितेश राणे आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील चाकरमान्यांकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने मतदानासाठी आले होते.

उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार संदेश पारकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. ऐन निवडणूकीच्या तोंडावर उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांना निवडणुकीसाठी फार कालावधी मिळाला नाही. मागच्या निवडणुकीच्या तुलनेने यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने याचा फटका कुणाला बसणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Maharashtra Voting Percent : वाढलेला टक्का प्रस्थापितांना धक्का! सर्वाधिक मतदानाचे १५ मतदारसंघ, कोणकोणत्या दिग्गजांना धाकधूक?

कुडाळमध्ये कोण सरस?

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक नेतृत्व करत आहेत. या मतदारसंघांमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळाला. या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष वैभव नाईक कार्यरत असून त्यांचा या मतदारसंघात संपर्क देखील मोठा आणि दांडगा आहे. अनेक विकासकामं देखील वैभव नाईक यांनी केली आहेत. मात्र खासदार नारायण राणे हे निलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघात गेले वीस दिवस तळ ठोकून होते. निलेश राणे हे गेल्या तीन ते चार वर्षापासून या मतदारसंघामध्ये तयारी करत होते. निलेश राणेंनी ग्रामीण भागांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मोठा केला आहे.

या मतदारसंघामध्ये सुद्धा मागच्या निवडणुकीच्या तुलनेने टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे. कुडाळ मतदारसंघात 72.29% टक्के मतदान झालं आहे, त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीमुळे या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडून येणार हे देखील पहावं लागणार आहे. या मतदारसंघांमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे अशी जोरदार फाईट पाहायला मिळाली होती, त्यामुळे वाढलेलं मतदान हे कोणाच्या पारड्यामध्ये पडणार आहे हे 23 तारखेला बघावं लागेल.

सावंतवाडीत चौरंगी लढत

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळाली. मुख्य लढत ही महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली अशी आहे. या मतदारसंघात 71.55% एवढे मतदान झाले आहे. मात्र अपक्ष उमेदवार विशाल परब आणि अपक्ष उमेदवार अर्चना घारे आहेत. या अपक्ष उमेदवारांचे आव्हान दीपक केसरकर आणि राजन तेली यांना असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये विशाल परब हे दीपक केसरकर यांची किती मतं मिळवण्यामध्ये यशस्वी होतात, त्यावर दीपक केसरकर यांचं भवितव्य ठरणार आहे.
Karuna Munde : अनेक महिलांसाठी हॉटेल बूक असतं… करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप
त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार अर्चना घारे या राजन तेली यांची किती मतं मिळवण्यामध्ये यशस्वी होतात हे देखील पाहावं लागणार आहे. जर अपक्ष विशाल परब हे 15 ते 20 हजार या मताधिक्यांमध्ये थांबले तर दीपक केसरकर हे निवडून येऊ शकतात. जर अपक्ष उमेदवार विशाल परब यांना 20 हजाराच्या बाहेर मताधिक्य मिळवलं तर दीपक केसरकर यांचा पराभव अटळ असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा विजय होऊ शकतो. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये कुणाचं पारडं किती जड आहे हे 23 तारखेला बघावं लागणार आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.