Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रस्त्यावर शितपेय हातगाडी हात लावला आणि होत्याचं नव्हतं झालं, ६ वर्षीय चिमुकली डोळ्यासमोर… अंध वडील आणि आईचा हंबरडा

5

6 Year Old Girl Died Of Electric Shock : नेरळमध्ये ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या शीतपेय हातगाडीला हात लावताच चिमुकली गाडीला चिकटली. तिची हालचाल थांबली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमुलकुमार जैन, कर्जत : नेरळमध्ये खांडा येथील टी-वाले हॉटेल येथे असलेल्या शितपेय हातगाडीचा शॉक लागून एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव रायमिन रफिक खान असे आहे. या घटनेस हॉटेल चालक आणि शीतपेय हातगाडी मालक यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे का? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या दुर्देवी घटनेनेमुळे नेरळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृत चिमुकलीचे अंध वडील, आई, लहान बहीण आणि लहान भाऊ असा परिवार असून हे पाच जणांचं कुटुंब नेरळ बाजारपेठ आणि परिसरात भिक्षा मागून आपली उपजीविका करतात. आता चिमुकलीच्या मृत्यूच्या घटनेची नेरळ पोलीस ठाणे उकल करुन चिमुकलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करुन मृत चिमुकलीच्या अंध वडील, आई आणि दोन भावांडाना योग्य न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Satara News : बोटाला शाई लावली, वोटिंग बटन दाबले आणि… मतदान केंद्रातच मृत्यू, काय घडलं?

नेमकं काय घडलं?

२० नोव्हेंबर रोजी बुधवारी एकीकडे विधानसभा निवडणूक मतदानाची धामधूम सुरू होती. तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या खान कुटुंबाचा संघर्ष सुरू होता. नेरळ पूर्व परिसरात बोपेले हजारे नगर येथे राहणारे अंध रफिक खान यांच्या सहा वर्षीय रायमिन या मुलीचा हात शितपेय हातगाडीला लागल्याने शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेरळ खांडा येथील टी-वाले हॉटेल समोर घडली.

रफिक हे अंध असल्याने त्यांच्यासह त्यांचे कुटुंब पत्नी, दोन लहान मुली आणि एक लहान मुलगा असे नेरळ बाजारपेठ आणि परिसरात भिक्षा मागून आपला गुजराणा करतात. नेहमी प्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी निघेलेले पीडित कुटुंब हे नेरळ – बदलापूर राज्य मार्गावरील नेरळ खांडा येथील ममदापूर चौकात असलेल्या सरफराज टी-वाले यांच्या हॉटेलजवळ आले.
Raigad News : मतदानाच्या दिवशी भररस्त्यात घडला भानामतीचा प्रकार; पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम
टी-वाले हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावलेल्या शीतपेय हातगाडीला त्यांच्या सहा वर्षीय मुलीने हात लावताच विजेचा झटका बसला आणि ती बेशुद्ध अवस्थेत हातगाडीला चिटकली. मुलीची कोणतीच हालचाल होत नसल्याचे मुलीच्या आईने हंबरडा फोडला. तिथे असलेल्या नागरिकांनी मुलीला तात्काळ खांडा येथील डॉ. शेवाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रस्त्यावर शितपेय हातगाडी हात लावला आणि होत्याचं नव्हतं झालं, ६ वर्षीय चिमुकली डोळ्यासमोर… अंध वडील आणि आईचा हंबरडा

दरम्यान, नेरळ – कल्याण राज्य मार्ग हा १४० फूट रुंदीकरण असा मंजूर असताना, शासनाचे नियम धाब्यावर बसून रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले जात आहेत. यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही. त्यातच अनेक हॉटेल धारक शासनाचे नियम पादळी तुडवत अशा हातगाड्या चालकांना अभय देत असल्याचं दिसतं आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.