Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अजित पवार किंग मेकर! या तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा दावा
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा निकाल २३ तारखेला लागणार असला तरी त्याआधी अनेक दावे केले जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठा दावा केला आहे.
राज्यात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. एक हाती सरकार कोणाचे येणार नाही. असे होणार नाही की महायुती १७५ आणि महाविकास आघाडी ११० जागा असे चित्र असणार नाही. दोन चार जागांच्या फरकाने महायुतीला निसटता विजय मिळले. फार मोठा विजय मिळणार नाही, तर निसटते सरकार स्थापन होईल असे अमोल मिटकरी म्हणाले. तसेच येणाऱ्या २५ नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून निसटत सरकार महायुतीतचे येणार असे ते म्हणाले.
निकालाआधीच राडा सुरू! काँग्रेसचे कार्यकर्ते झाले आक्रमक; काळा गाढव आणला, शरद कोळीचा पुतळा बसविला
मतदानानंतर विविध एक्झिट पोलमध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजपचा असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीमध्ये भाजपनंतर शिवसेना शिंदे गटाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा मिळतील असा अंदाज आहे. एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला २० ते २५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? एक्झिट पोलने दिले उत्तर! शिवसेनेला जास्ती जास्त इतक्या जागा मिळण्याचा अंदाज
एक्झिट पोलच्या अंदाजांवर बोलताना मिटकरी म्हणाले, राज्यात अजित पवार गटाला ३५ ते ४० जागा मिळतील. राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे विज बिल माफ या सर्वाचा फायदा महायुतीला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एका बाजूला मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील पर्वती मतदारसंघात मुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून एक प्रकारे अजित दादांसाठी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.