Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उमेदवारांचे प्रतिनिधी पोलिसांच्या वेषात, विचारणा करताच उडवाउडवीचे उत्तरं; VIDEO व्हायरल

5

Nagar Crime News: भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी म्हटले आहे की, आमदार पवार यांनी याबद्दल केलेली पोस्ट खोटी आहे. यामुळे प्रशासनाची, मतदारसंघाची व महाराष्ट्राची दिशाभूल होत आहे.

हायलाइट्स:

  • इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या बाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
  • काही उमेदवारांचे प्रतिनिधी सुरक्षारक्षकांप्रमाणे कपडे घालून आले होते
  • बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
महाराष्ट्र टाइम्स
कर्जत जामखेड मतदारसंघ स्ट्राँगरुम बाहेर वाद

नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेले वाद आणि आरोप्रत्यारोप मतदानानंतरही थांबलेले नाहीत. आता इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या बाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही उमेदवारांचे प्रतिनिधी सुरक्षारक्षकांप्रमाणे कपडे घालून आले होते. त्याला भाजपच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यावरून दोघांत बाचाबाची झाली. बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या संघटनेसंबंधी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला केल्याचा आरोप केला. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत कोणीही आत शिरण्याचा प्रयत्न केला नसून स्ट्राँगरुममध्ये ठेवलेली यंत्रे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.यासंबंधी रोहित पवार यांनी म्हटले आहे की, कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या सुमारे २५-३० कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडला. याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे. पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

बंडखोर, अपक्षांवर नजर; फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय; सूरत प्लान यशस्वी केलेले तिघे मोहिमेवर

तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी म्हटले आहे की, आमदार पवार यांनी याबद्दल केलेली पोस्ट खोटी आहे. यामुळे प्रशासनाची, मतदारसंघाची व महाराष्ट्राची दिशाभूल होत आहे. त्याचे असे झाले की, काल रात्री साडेअकरा वाजता भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना माहिती मिळाली की, इव्हीएम ठेवल्याच्या ठिकाणी स्ट्राँगरुम परिसरात बारामती ऍग्रोचे काही कर्मचारी पोलिसांच्या वेशात स्ट्राँगरुमच्या गेटमध्ये व आसपास वावरत आहेत. ते पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बसले आहेत त्यांच्याकडे अत्याधुनिक मोबाईल व इलेक्ट्रॉनिक यंत्रे आहेत. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी तेथे पोहचले. सर्वांनी त्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते बारामती ऍग्रोचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता.

बारामती ऍग्रोच्या कर्मचाऱ्यांना गेटच्या आता येण्याची व येथे थांबण्याची परवानगी कशी? याचा जाब पोलिसांना विचारला असता भाजपा कार्यकर्त्यावर व इतर ग्रामस्थांवर स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा खोटा आरोप आमदार पवार हे सोशल मीडियावर करत आहेत. यासंबंधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, कर्जत-जामखेड मतदारसघांतील स्ट्राँगरुम परिसरात कोणत्याही व्यक्तीने शिरण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींना तेथे थांबता येते. तशी सोय करण्यात आलेली आहे. त्यानुसार रोहित पवार, सतीश डुकरे, राम नारायण शिंदे, शहाजी उबाळे या उमेदवारांचे प्रतिनिधी तेथे बसले होते. त्यांनी परिधान केलेल्या वेषावरून नंतर आलेल्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हा सर्व प्रकार बाहेर झाला आहे आतमध्ये शिरण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

विजयसिंह होलम

लेखकाबद्दलविजयसिंह होलमविजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.