Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Solapur Sharad Koli Case Registered: मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या दरम्यान माजी आमदार उत्तप्रकाश खंदारे आणि उपनेते शरद कोळी यांनी पत्रकार भवनाजवळील पक्षाच्या कार्यालयाजवळ खासदार प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले.
हायलाइट्स:
- प्रणिती शिंदेंच्या विरोधात आंदोलन
- शरद कोळींवर गुन्हा दाखल
- सोलापुरात राजकारण तापलं
विधानसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंचा मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं…
उद्धव ठाकरे यांची दक्षिण सोलापुरात सभा झाली होती. अमर पाटील यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे सोलापुरात आले होते. भाषण करताना उद्धव ठाकरेंनी खा.प्रणिती शिंदे यांचे कान टोचले होते. प्रणिती शिंदेंना आवाहन केले होते. ”मी तुझ्या प्रचाराला आलो होतो. आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती”. त्यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये प्रचाराला येण्याचे आवाहन केले होते. परंतु खा.प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे दक्षिण सोलापुरात एकदाही शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात दिसले नाहीत. मतदान करून बाहेर आल्यानंतर जाहीरपणे सांगितले आणि अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला.
दरम्यान, पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश असल्याने गर्दी करु नका असं आवाहन देखील आंदोलकांना करण्यात आलं होते. याकडे दुर्लक्ष करुन आंदोलकांनी आंदोलन करुन आदेशाचा भंग केला. कोणत्याही परवानगी विना आंदोलन केल्याने शरद कोळी आणि आंदोलकांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २२३, महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली आहे.