Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
08:19 AM, Nov 23 2024
मुंबादेवी येथून अमिन पटेल, तर वरळी येथून आदित्य ठाकरे आघाडीवर असल्याची माहिती
08:18 AM, Nov 23 2024
२८८ पैकी ७० जागांचे कल हाती, महायुती ३९ जागांवर आघाडीवर, महाविकास आघाडी २८ तर इतर ४ जागांवर आघाडीवर
08:17 AM, Nov 23 2024
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रोहित पवारही आघाडीवर आहेत, तर युगेंद्र पवारही आघाडीवर आहेत
08:16 AM, Nov 23 2024
Mumbai Vidhan Sabha Nivadnuk: मलबार हिल येथून मंगलप्रभात लोढा हे आघाडीवर
08:13 AM, Nov 23 2024
महायुती ३३ जागांवर आघाडीवर, महाविकास आघाडी १८ तर इतर ४ जागांवर आघाडीवर
08:12 AM, Nov 23 2024
सातारा सह जिल्ह्यातील सात मतदारसंघात पोस्टल मतमोजणी सोबत पोस्टल मतदारांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
08:10 AM, Nov 23 2024
महायुती २० जागांवर आघाडीवर, महाविकास आघाडी १२ तर इतर २ जागांवर आघाडीवर
08:09 AM, Nov 23 2024
परळीतून धनंजय मुंडे सध्या आघाडीवर आहे, तर येवल्यात छगन भुजबळ हे आघाडीवर आहेत
08:08 AM, Nov 23 2024
पोस्टल मतदानाला सुरुवात, भाजपचे कुठले उमेदवार आघाडीवर
- नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर
- पुणे कॅनटॉन्मेंटमधून भाजपचे सुनिल कांबळे आघाडीवर
- कोथरुडमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर
- जामनेरमधून गिरीश महाजन आघाडीवर
- नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर
08:05 AM, Nov 23 2024
बारामतीत युगेंद्र पवार आघाडीवर आहेत
पोस्टल मतदानाला सुरुवात, सुरुवातीच्या कलांमध्ये बारामती येथून युगेंद्र पवार आघाडीवर असल्याची माहिती
08:04 AM, Nov 23 2024
टपाली मतमोजणीला सुरुवात
दुसरा कल काँग्रेसच्या बाजुने
07:38 AM, Nov 23 2024
निवडून आल्यानंतर पक्षासोबतच राहणार, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवारांकडून घेतले प्रतिज्ञापत्र
- निकालापूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार अलर्ट मोडवर
- विद्यमान आमदार आणि उमेदवारांकडून घेतली प्रतिज्ञापत्र
- निवडून आल्यानंतर पक्षासोबतच राहणार असल्याचा उल्लेख
07:07 AM, Nov 23 2024
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी
- जिल्ह्यातील ८ ठिकाणी होणार मतमोजणी
- सांगली जिल्ह्यात ७१. २८ टक्के मतदान
- सांगली, तासगाव, कवठेमंकाळ, इस्लामपूर, शिराळा, जत, विटा, आटपाडी, मिरज, पलूस, कडेगाव मतदारसंघाकडे लक्ष
06:52 AM, Nov 23 2024
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून सुरुवात
मतमोजणीसाठी ८९ टेबल लावण्यात आले आहे तर १०४ फेऱ्या होणार आहेत, नंदुरबार जिल्ह्यात ७१.७८ टक्के मतदान झालं असल्याने मतदार राजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार
06:51 AM, Nov 23 2024
कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी
- 10 जागांसाठी 121 उमेदवार होते निवडणूक रिंगणात
- जिल्ह्यात 10 ठिकाणी होणार मतमोजणी
- राज्यातील सर्वाधिक मतदान 76.25 मतदान कोल्हापुरात
- कागल, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण , चंदगड, करवीर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष
06:50 AM, Nov 23 2024
सत्ताकौल कुणाला? पूर्व विदर्भात बहिणींची बाजी, पश्चिममध्ये सोयाबीन कुणाला तारणार?
06:12 AM, Nov 23 2024
Maharashtra Times LIVE : धाकधूक वाढली, काउंटडाऊन सुरू, कुणाचा करेक्ट कार्यक्रम? | Election Results
06:11 AM, Nov 23 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज
- मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई
- ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी १४ टेबल
- टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही एकूण ३६ टेबल
- जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची माहिती
06:10 AM, Nov 23 2024
नागपूर – मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मतमोजणी केंद्रावरील टेबल व्यवस्था व सुरक्षिततेचा आढावा घेतला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून सुरक्षितेच्या बाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत
06:09 AM, Nov 23 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज
- सकाळी ०८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणी
- ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी 14 टेबल
- मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त.
- प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी
- प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल
06:07 AM, Nov 23 2024
विधानसभा निवडणुकीचा आज महाफैसला, काहीच तासात मतमोजणीला होणार सुरुवात
विधानसभा निवडणूक निकाल आज लागणार आहे, सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे