Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Yeola Assembly Election Result 2024: येवल्यात छगन भुजबळ वर्चस्व राखणार की शरद पवारांच्या शिलेदार गुलाल उधळणार?

4

Yeola NCP AP Chhagan Bhujbal vs NCP SP Manikrao Shinde Vidhan Sabha Election 2024 Result : येवल्यात महायुतीचे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांचं वर्चस्व आहे. त्यांना शरद पवारांच्या शिलेदाराचं आव्हान असून मतदारसंघात कोण गुलाल उधळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Yeola Assembly Election Result 2024 in Marathi

येवला : नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असून त्यांचं या मतदारसंघात वर्चस्व आहे. या मतदारसंघातील ते विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांचा राष्ट्रवादी गट अशी लढत या मतदारसंघात आहे.

छगन भुजबळ हे येवल्यातील आमदार असून त्यांचं या मतदारसंघात वर्चस्व आहे. मात्र यंदाची निवडणूक अनेक कारणांसाठी भुजबळांसाठी आव्हानात्मक ठरली आहे. मराठा आरक्षण, कांदा प्रश्न अशा अनेक गोष्टी आहेत. आता येवल्यातील जनता कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजितदादा की शरद पवारांच्या भावनिक आवाहनाला जनता पाठिंबा देणार हे निकालानंतरच समोर येईल.

Live Updates –
– येवलात छगन भुजबळ पिछाडीवर
– दुसरी फेरी – छगन भुजबळ (NCP अजित पवार) – ९५३९
माणिकराव शिंदे (पवार गट) – १०८६२
– माणिकराव शिंदे १३२३ मतांनी पुढे
– छगन भुजबळ आघाडीवर
तिसऱ्या फेरी अखेरीस छगन भुजबळ यांनी घेतली ८६ मतांनी आघाडी
– चौथ्या फेरीत छगन भुजबळांची सुमारे तीन हजारांची आघाडी
– सहाव्या फेरी अखेर छगन भुजबळांना ६९०० मतांची आघाडी
– दहाव्या फेरी अखेर छगन भुजबळांना ११२८० मतांची आघाडी
– अकराव्या फेरी अखेर येवल्यात छगन भुजबळांना १२६८१ मतांची आघाडी
– आता बाराव्या फेरीची मतमोजणी सुरू
– १६ फेरीअखेर छगन भुजबळांना १८१७८ मतांची आघाडी
– १७ फेरीची मतमोजणी सुरू
– १७ फेरीअखेर छगन भुजबळांना २१७२७ मतांची आघाडी
– १८व्या फेरीची मतमोजणी सुरू
– १८ व्या फेरी अखेर छगन भुजबळांना २५८२७ हजार मतांची आघाडी
– २३व्या फेरी अखेर भुजबळ यांना २६६८१ मतांची आघाडी

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.