Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Chetan Tupe wins Hadapsar Assembly Election: हडपसरमध्ये अजित पवारांच्या शिलेदाराची बाजी, चेतन तुपेंनी फडकावली विजयी पताका

4

NCP AP Chetan Tupe wins Hadapsar Vidhan Sabha Election Result 2024: हडपसरमध्ये तिहेरी लढत होती. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मनसे अशी लढत असताना अजित पवारांच्या शिलेदाराने विधानसभेत विजय मिळवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Hadapsar Assembly Election Result 2024 in Marathi

पुणे : पुणे जिल्ह्यातील हडपसर मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची परंपरा आहे. या मतदारसंघात तिहेरी लढत झाली. या मतदारसंघात सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत. यंदा ते पुन्हा विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अजित पवारांच्या शिलेदाराचा चेतन तुपे यांचा हडपसरमध्ये विजय झाला आहे.

दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिला होता. मनसेकडून साईनाथ बाबर रिंगणात होते. तर अपक्ष गंगाधर बधे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. विधानसभेच्या जागावाटपावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही हडपसर विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळाली होती.

यंदाच्या निवडणुकीत चेतन तुपेंना पुन्हा संधी मिळणार की शरद पवार आणि राज ठाकरेंचे उमेदवार विजयी पताका फडकवणार याची उत्सुकता होती. अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांनी विजय मिळवत विजयी पताका फडकावली आहे.

Live Updates –
– चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांच्यामध्ये चेतन तुपे यांनी १२२८५ ची लीड चौथ्या फेरी अखेर
– सहावी फेरी- चेतन तुपे १६३०८ मतांनी आघाडीवर
– आठवी फेरी – आठवी फेरी २२९०८ मतांनी चेतन तुपे आघाडीवर
– बारावी फेरी अखेर – चेतन तुपे आघाडीवर
– हडपसर मतदार संघातून चेतन तुपे २४,४३४ मतांनी आघाडीवर
– चेतन तुपे यांना ७००६४१ मतं, तर प्रशांत जगताप यांना ४६ हजार २०७ मतं
– हडपसर १५वी फेरी पूर्ण – चेतन तुपे, १९५९९ लीड
– हडपसरमध्ये सोळाव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे १५५०० मतांनी आघाडीवर
– तुपे २५००० हून अधिक मतांनी आघाडीवर होते, आता त्यांचे लीड कमी होत आहे
– हडपसरमध्ये चेतन तुपे यांचे मताधिक्य घटले, १७व्या फेरी अखेर ६५०० मतांची आघाडी
– १७व्या फेरी अखेर कोंढवा परिसरामध्ये प्रशांत जगताप यांना लीड मिळाले असून ८८४१ मताची लीड प्रशांत जगताप यांना मिळाली. चेतन तुपेंचे लीड कमी झाले
– चेतन तुपे यांचे लीड कमी होत ६५८१ वर आले
– हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार पक्षात चुरस पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनी सुरुवातीच्या काही फेऱ्यात २५ हजाराहून अधिक मताधिक्य मिळवले होते. आता १८व्या फेरी अखेर तुपे यांचे मताधिक्य केवळ ३१०० राहिले आहे.
– १९व्या फेरीत अखेर चेतन तुपे यांचे लीड ४२३३
– हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अप गट) चेतन तुपे विजयी

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.