Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Muktainagar Assembly Election Result 2024: रोहिणी खडसेंचा दारुण पराभव, शिंदेसेनेच्या चंद्रकांत पाटलांच्या गळ्यात आमदारकीची माळ

4

Muktainagar Shivsena Eknath Shinde Chandrakant Patil vs NCP sharad pawar Rohini Khadse Vidhan Sabha Election 2024 Result: जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात चर्चेतला मतदारसंघ आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीतर्फे रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.

हायलाइट्स:

  • दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
  • खडसेंच्या कन्येच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार?
  • चंद्रकांत पाटील बाजी मारणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक निकाल २०२४

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी पार पडली. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात रंगत दिसून येत असून, जनतेनं कोणाच्या पारड्यात आपली मत टाकली आहेत याकडे आता जनतेचं लक्ष लागलंय. राज्यातील २८८ जागांपैकी मुक्ताईनगर मतदारसंघाला राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. ही जागा दीर्घकाळापासून भाजपच्या ताब्यात आहे. मागील काही वर्ष भाजपच्या तिकिटावर एकनाथ खडसे येथून निवडून आले होते. या मतदारसंघातून आता शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यात थेट लढत होती. आता पुन्हा एकदा रोहिणी खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. खडसेंच्या कन्येचा पराभव झाला आहे.जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात चर्चेतला मतदारसंघ आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीतर्फे रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत होती. महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा जागा ही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यातील एक जागा मानली जाते. येथे भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव गणपतराव खडसे म्हणजेच एकनाथ खडसे यांनी सलग सहा वेळा निवडणूक जिंकली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ खडसे यांचा हा विजयरथ थांबला. २०१९च्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्येचा यंदाच्या २०२४च्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. जळगाव जिल्ह्यात ६०.३७ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये, रावेरला सर्वाधिक मतदान

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ राज्यात नावाने कमी आणि एकनाथ खडसे यांच्या नावाने जास्त ओळखला जातो. १९९० पासून भाजपला या जागेवर कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. १९९० ते २०१४ पर्यंत या जागेवर फक्त एकनाथ खडसे निवडणूक लढवत आहेत आणि जिंकत आहेत. मात्र, २०१९च्या निवडणुकीत असं काही घडलं की, ज्याची खडसेंनी कल्पनाही केली नसेल. या निवडणुकीत खडसे यांची कन्या रोहिणी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात चंद्रकांत निंबा पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. या निवडणुकीत चुरशीची लढत असतानाही चंद्रकांत निंबा पाटील यांनी रोहिणी यांचा पराभव केला होता.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.