Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shiv Sena UBT MLAs List : पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीत लढताना ९५ जागांवर उमेदवार दिले होते. मात्र तब्बल ७५ जणांना पराभवाचा धक्का बसला आहे.
नितीन देशमुख, सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, कैलास पाटील, दिलीप सोपल, भास्कर जाधव हे नऊ जण आमदार पुन्हा निवडून आले आहेत. तर वरुण सरदेसाईंच्या रुपाने नवा आमदार मिळाला आहे.
जोगेश्वरी पूर्व येथून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना अनंत (बाळा) नर यांनी पराभवाचा धक्का दिला. तर मातोश्रीचे अंगण मानले जाणारा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना पराभवाची धूळ चारत आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणला.
Devendra Fadnavis : देवेंद्र हे मोदींचे लाडके, ते मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा, फडणवीसांच्या ‘मातोश्रीं’ची ‘मन की बात’
माहीम, वरळी, शिवडी, भायखळा हे शिवसेने गड पक्षाने राखले. विशेष म्हणजे माहीम आणि भायखळ्याचे आमदार शिंदे गटात गेले, मात्र ठाकरेंनी ते आपल्याकडे खेचून आणले. माहीममधून सदा सरवणकर आणि अमित राज ठाकरे यांना पराभवाचा धक्का दिला. तर भायखळ्यातून यामिनी जाधव यांना हरवण्यात आलं.
Raj Thackeray : मनसेची दणदणीत हार, लेकालाही पराभवाचा धक्का, राज ठाकरेंची तीन शब्दात प्रतिक्रिया, समाचार कुणाचा?
ठाकरेंचे २० शिलेदार कोण?
मेहकर- सिद्धार्थ खरात
दर्यापूर – गजानन लवाटे
बाळापूर – नितीन देशमुख
वणी – संजय देरकर
परभणी – राहुल पाटील
विक्रोळी – सुनील राऊत
जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
दिंडोशी – सुनील प्रभू
वर्सोवा – हरुन खान
कलिना – संजय पोतनीस
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
माहीम – महेश सावंत
वरळी – आदित्य ठाकरे
शिवडी – अजय चौधरी
भायखळा – मनोज जामसूतकर
खेड आळंदी – बाबाजी काळे
उमरगा – प्रवीण स्वामी
उस्मानाबाद – कैलास पाटील
बार्शी – दिलीप सोपल
गुहागर – भास्कर जाधव