Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Solapur Vidhan Sabha Constituency : सोलापुरात महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी लोकसभेवेळी भाजपात प्रवेश केला आणि आता विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. काकांना जमलं नाही ते पुतण्याने करुन दाखवलं.
निकाल धक्कादायक, महायुतीकडून धर्माचा-पैशाचा उपयोग राजकारणासाठी; पराभवानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया
महेश कोठेंनी आमदार होण्यासाठी काँग्रेस सोडली, शिवसेना सोडली, राष्ट्रवादीत प्रवेश केला, तरीही महेश कोठेंचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकांत सपाटून पराभव झाला. महेश कोठेंसोबत पक्षात प्रवेश करणारे त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठेंनी ५० हजार मतांची आघाडी घेत, निवडणुकीत विजय संपादन करून दाखवलं. जे काकांना आयुष्यभर जमलं नाही, ते पुतण्याने करून दाखवलं.
वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध विजयी… उद्धव ठाकरेंच्या घमंडीचा हा पराभव; किरीट सोमय्यांची निकालादरम्यान टीका
कोठेंना तुतारीची साथ मिळाली तरी मालकांच्या वोट बँकेला हात लावू शकले नाही
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघात २००९ नंतर प्रथमच महेश कोठे आणि विजयकुमार देशमुख हे आमने-सामने आले होते. २००९ साली झालेल्या निवडणुकीच्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी कोठे यांनी सर्व तयारी केली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यभरात हवा असलेल्या तुतारीची साथ महेश कोठेंना मिळाली होती. मात्र, विजयकुमार देशमुख यांची वोट बँक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची मदत या निवडणुकीत निर्णायक ठरली असून त्याचा फायदा देशमुख यांना झाल्याचे दिसून येत आहे.
Chhagan Bhujbal wins Yeola Assembly Election: येवल्यात छगन भुजबळ यांनी गड राखला, शरद पवारांच्या शिलेदाराचा दारुण पराभव
एका भाषणाने देवेंद्र कोठेंच्या नशीबाला कलाटणी मिळाली
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी राम सातपुते, योगी आदित्यनाथ यांच्या व्यासपीठावरून भाषण केले होते. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत सडकून टीका केली होती. देवेंद्र कोठेंच्या भाषणानंतर सर्व स्तरातून टीका झाली होती. त्या भाषणामुळे देवेंद्र कोठे सोलापुरातील एक कट्टर चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले होते. लोकसभेच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देवेंद्र कोठेंची इमेज तयार झाली होती. संधीचे सोने करत देवेंद्र कोठेंनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवली आणि विधानसभा निवडणुकीत १ लाख १९ हजार मतं मिळवून दाखवली.
काकाला आयुष्यभर जमलं नाही ते पुतण्याने करून दाखवले, पुतण्याची भाजपात प्रवेश करत विधानसभेत बाजी
काकाचा उत्तर विधानसभा मतदार संघात पराभव, तर पुतण्या मध्यमधून विजयी
महेश कोठे यांचा भाजपचे विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून जवळपास ५० हजार मतांची लीड घेत पराभव केला. महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठेंनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचा ५० हजार मतांच्या फरकाने पराभव करत विजय संपादन केला. सोलापुरातील राजकीय वर्तुळात काका – पुतण्याची एकच चर्चा सुरू आहे.