Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उत्तर महाराष्ट्रात भाजप थोरला! ३५पैकी ३३ जागांवर महायुतीचा विजय, महाविकास आघाडीची धूळधाण

22

Mahayuti Won 33 Seats In North Maharashtra: भाजपने सर्वाधिक १६ जागा जिंकल्या असून, शिवसेना शिंदे गट ९ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आठ जागा जिंकल्या असून, त्यात नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वांत मोठा आहे.

महाराष्ट्र टाइम्स
mahayuti govt

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीच्या झंझावातात उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची धुळधाण उडाली असून, ३५ पैकी तब्बल ३३ जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यात भाजपने सर्वाधिक १६ जागा जिंकल्या असून, शिवसेना शिंदे गट ९ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आठ जागा जिंकल्या असून, त्यात नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वांत मोठा आहे. गेल्या वेळेस पाच जागांवर असलेल्या काँग्रेसचे अस्तित्व आता अवघ्या एका जागेवर राहिले असून, एमआयएमलाही दोनपैकी एक जागा गमवावी लागली आहे. मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, अनिल पाटील आणि गुलाबराव पाटलांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे.

महाजन पुन्हा ठरले ‘संकटमोचक’
नाशिकमध्ये महायुतीसाठी ग्रामविकास गिरीश महाजन पुन्हा एकदा संकटमोचक ठरले आहेत. शहरातील तीनपैकी दोन जागांवर झालेली बंडखोरी, नाशिक मध्य मतदारसंघातील अंतर्गत नाराजी, तसेच चांदवडमधील भाऊबंदकीने भाजपची डोकेदुखी वाढली होती. घटकपक्षांमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याने महायुतीची अडचण झाली होती. मात्र, महाजन यांनी ऐन दिवाळीत नाशिक शहरासह ग्रामीणमध्ये तळ ठोकून बंडखोरांची समजूत काढली. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांची प्रत्यक्ष, तसेच फोनवर चर्चा करून त्यांच्या अडचणी समजूत घेत त्यांना बळ पुरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा यशस्वी करून दाखवत जिल्ह्यात महायुतीला बळ दिले. त्यामुळे भाजपच्या पाचही जागांसह महायुतीच्या १४ जागा जिंकण्यात महाजन यांची भूमिका मोलाची ठरली आहे.
लाडक्या बहिणींकडून सत्तेची भेट! महायुतीचा अभूतपूर्व विजय, आघाडीचा धुव्वा, कोणाला किती जागा मिळाल्या?
मंत्र्यांनी राखली प्रतिष्ठा
महायुती सरकारमधील दादा भुसे, छगन भुजबळ, गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील आणि डॉ. विजयकुमार गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या सर्वच दिग्गजांनी आपले गड मोठ्या मताधिक्यांनी राखताच, जिल्ह्यातील राजकारणावरील आपली ताकदही वाढवली आहे. नाशिकमधून भुसेंनी लाखाच्या फरकाने, तर भुजबळांनी २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला आहे. जळगावमधून महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटलांनी आपले गड शाबूत ठेवले आहे. नंदुरबारमध्ये डॉ. गावितांनी तब्बल ७५ हजारांनी मताधिक्य घेऊन जिल्ह्याच्या राजकारणातील स्थान अधिक घट्ट केले आहे.
मनसेचे रेल्वे इंजिन यार्डातच! विधानसभा निवडणुकीत खातेच उघडले नाही, राज ठाकरेंना जनतेनं का नाकारलं?
प्रमुख पराभूत
■ के. सी. पाडवी (काँग्रेस)
■ कुणाल पाटील (काँग्रेस)
■ रोहिणी खडसे (शरद पवार गट)
■ समीर भुजबळ (अपक्ष)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.