Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Saroj Ahire Wins Devlali Election Results 2024: आमदार आहिरे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची आघाडी शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत कायम राखल्याने त्यांनी ही लढत एकहाती जिंकली.
आमदार आहिरे यांनी ४० हजार ६७९ चे मताधिक्य घेत सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयानंतर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गट, रिपाइं या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. प्रमुख पराभूत उमेदवार या निकालानंतर ‘नॉट रिचेबल’ झाले. देवळालीत महायुतीच्या आमदार सरोज आहिरे यांचा महाविकास आघाडीतील योगेश घोलप यांच्याशी खरा सामना होता. मात्र, ऐनवेळी महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेकडून डॉ. राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी केल्याने हा सामना तिरंगी झाला. डॉ. अहिरराव यांनी सुरुवातीला कडवे आव्हान उभे केले. मात्र, अखेर त्यांचा आहिरेंपुढे निभाव लागू शकला नाही. डॉ. अहिरराव यांना दुसऱ्या क्रमांकाची ४१ हजार ४ मते मिळाली.
आहिरे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार योगेश घोलप यांना अवघी ३९ हजार २७ मते मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानी फेकले गेले. माजी मंत्री बबन घोलप यांनी ऐनवेळी पक्षांतर करूनही ते योगेश घोलप यांचा पराभव टाळू शकले नाहीत. वंचितचे अविनाश शिंदे यांना ११ हजार ८३१, तर मनसेच्या मोहिनी जाधव यांना ३,९३१, तर स्वराज्याचे विनोद गवळी यांना १२६९ मते मिळाली. उर्वरित राजू मोरे, अमोल कांबळे, कृष्णा पगारे, भारती वाघ, रविकिरण घोलप आणि लक्ष्मी ताठे या सहा उमेदवारांना मतांचा हजाराचा टप्पादेखील पार करता आला नाही. आमदार आहिरे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची आघाडी शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत कायम राखल्याने त्यांनी ही लढत एकहाती जिंकली.
मंत्रिपदाची माळ कोणाला? दोन्ही ‘दादा’ महत्त्वाच्या खात्यांचे दावेदार; वळसे पाटलांनाही संधी शक्य
…या फॅक्टरमुळे विजय सोपा
विकासकामांवर आधारित केलेला प्रचार, लाडकी बहीण योजनेचा फायदा, मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील देवस्थानचे नाव कमी करण्यात आलेले यश, नकारात्मक प्रचारापासून दूर,
युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांची बांधलेली मोट, कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमुळे वाढलेला मतटक्का आदी बाबींमुळे सरोज आहिरे यांचा विजय सोपा झाला. त्याचप्रमाणे विरोधकांनी केलेला नकारात्मक प्रचाराचा अतिरेक, मतदारसंघातील मतदारांशी गेल्या पाच वर्षांत समन्वयाचा अभाव, मतदारांना गृहित धरणे, पक्षफुटीमुळे पदाधिकाऱ्यांची ऐनवेळी सुटलेली साथ आदी विरोधकांच्या उणिवाही आहिरे यांच्या विजयास हातभार लावणाऱ्या ठरल्या.
मनसेचे रेल्वे इंजिन यार्डातच! विधानसभा निवडणुकीत खातेच उघडले नाही, राज ठाकरेंना जनतेनं का नाकारलं?
सासूबाई नातवासोबत…
नाशिकरोड : सरोज आहिरे विजयी झाल्या, तरी घरी त्यांच्या सासूबाई कल्पना वाघ यांचा नातवासोबत नित्याचा दिनक्रम सुरू होता. आपली सून निवडणुकीत विजयी झाल्याचे समजताच त्यांचा चेहरा आनंदाने खुलला. निकालाकडे सकाळपासूनच लक्ष लागून होते. नातेवाइकांचे फोन सुरू होते. मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे विजयाची खात्री होती. कामाला महत्त्व देणे, दिलेल्या शब्दाला जागणे या गुणांमुळेच मतदारांनी पुन्हा सेवेची संधी दिली, अशा शब्दांत आमदार आहिरे यांच्या सासू कल्पना वाघ यांनी सुनेचे कौतुक केले. महिलांना सर्वच घटकांकडून पाठबळ मिळाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नाशिक पूर्वेत राहुल ढिकलेंची दुसऱ्यांदा बाजी; दांडगा जनसंपर्क, ‘लाडकी बहीण’सह हिंदुत्वाची साथ
मतदारांनी विकासाला कौल दिला. हा विजय मायबाप जनतेचा असून, या विजयासाठी मेहनत घेतलेले महायुतीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार. विकासाची गंगा यापुढील काळात सुरूच ठेवणार हा शब्द मतदारांना देते.-सरोज आहिरे, आमदार
आकडे बोलतात…
एकूण मतदान- १,८३,७५४
टक्केवारी- ६३.३९
सरोज आहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)- ८१,६८३
डॉ. राजश्री अहिरराव (शिवसेना शिंदे गट)- ४१,००४
योगेश घोलप (शिवसेना ठाकरे गट)- ३९,०२७
आमदार आहिरे यांचा ४० हजार ६७९ मतांनी विजय