Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वंचित फॅक्टरचा मविआला पुन्हा धक्का, मराठवाड्यातील तीन जागांवर मतटक्का गडगडला

5

Mahavikas Aghadi lost in Parbhani Assembly Election: मागील निवडणुकीप्रमाणेच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या निवडून येणाऱ्या तीन जागा पडल्या आहेत. गंगाखेड पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचे दिसून येत आहे.

Lipi

धनाजी चव्हाण, परभणी : मागील निवडणुकीप्रमाणेच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या निवडून येणाऱ्या तीन जागा पडल्या आहेत. गंगाखेड पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचे दिसून येत आहे. तर परभणी विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना फायदा झाला आणि ते विजयी झाले. त्यामुळे मागील २०१९च्या लोकसभा विधानसभा निवडणुका आणि २०२४च्या लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांनी तगडे आव्हान दिले होते. लोकसभा निवडणुकीनंतर पाथरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेसचे सुरेश वरपूडकर सहज निवडून येतील असा विश्वास सर्वांनाच होता. पाथरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून इंजिनिअर सुरेश फड यांना सुरुवातीला उमेदवारी देण्यात आली होती. पण मतदानाच्या आधी दोन दिवस वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे बहुतांश मते ही सईद खान यांना मिळाली. या निवडणुकीत सैद खान यांनी 54 हजार 647 मते घेतली आहेत. तर विजयी उमेदवार राजेश विटेकर यांनी 83 हजार 767 मध्ये घेतली आहेत. तर माजी आमदार सुरेश वरपूडकर यांना 70 हजार 523 मते पडले आहेत.
Video : अजितदादांनी सांगितला नरेंद्र मोदी आणि सुनील शेळके यांच्या भेटीचा किस्सा, मी मोदींना सांगितलं की…
आमदार राजेश विटेकर आणि काँग्रेसचे माजी आमदार सुरेश बोरकर यांच्यामध्ये केवळ 13 हजार मतांचा फरक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवारांनी तब्बल 54 हजार मते खाल्ल्याने महाविकास आघाडीच्या सुरेश वरपूडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अशीच परिस्थिती जिंतूर विधानसभा मतदारसंघाची देखील आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मेघना बोर्डीकर यांना एक लाख 13 हजार 432 मते मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेले माजी आमदार विजय भांबळे यांना एक लाख आठ हजार 916 मध्ये मिळाले आहेत. माजी आमदार विजय भांबळे यांचा केवळ सहा हजार मतांनी पराभव झाला आहे. तर याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक रिंगणात उभे असलेले सुरेश नागरे यांना तब्बल 56 हजार 474 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मते खाल्ल्यामुळे महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार विजय भांबळे यांना पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चांगली मते घेतल्यामुळे विजय भांबळे यांना 3000 मतांच् फरकाने पराभव पत्करावा लागला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती 2024 च्या विधानसभा निवडणुकीत झाली आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्रही तशाच प्रकारचे आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक रिंगणात दुसऱ्यांना उभे असलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांना एक लाख 41 हजार 544 मध्ये पडली आहेत. तर त्यांना कडवी झुंज देणारे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांना एक लाख 15 हजार 252 मते पडली आहेत. विशाल कदम हे 31 हजार मतांनी पराजित झाले असले तरी वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक रिंगणात उभे असलेल्या सिताराम घनदाट यांनी 43 हजार 26 मध्ये खाल्ली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मते खाल्ल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना तिसऱ्यांदा विजय मिळविता आला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आनंद भरोसे यांचा तब्बल 35 हजार मताधिक्क्ने पराभव केला. पण परभणी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नव्हता म्हणून राहुल पाटील यांना ही निवडणूक सोपी केली असल्याचे बोलली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने सय्यद सनी उर्फ माजूलाला यांना परभणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण ऐनवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार प्रत्यक्षरीत्या या निवडणुकीत उभा नव्हता. नंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

एकंदरीतच 2019 च्या निवडणुकांपासून वंचित बहुजन आघाडी स्वतंत्ररित् राज्यामध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका महाविकास आघाडीला बसताना दिसत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारांना 25 ते 30 हजार मते मिळत होती आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तोच आकडा जवळपास 50 हजाराच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे पुरोगामी मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी तसेच आता महाविकास आघाडीत आलेल्या शिवसेनेला याचा जोरदार फटका बसताना दिसत आहे. परभणी जिल्ह्यातल्या चारही विधानसभा या महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास सर्वांनाच वाटत होता. पण पुरोगामी मताचे झालेले विभाजन आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर घेतलेली मते त्यामुळेच महाविकास आघाडीला परभणी जिल्ह्यात केवळ एकच जागा जिंकता आली अन्य तीन जागांवर पराजय पत्करावा लागला.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.