Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पंकजा मुंडे होणार मुख्यमंत्री?, शिवसेनेच्या महिला नेत्याने केली थेट मोठी मागणी

5

महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आता मुख्यमंत्री पदाबद्दल थेट मोठी मागणी केल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी तशी एक पोस्टच सोशल मीडियावर शेअर केलीये. ओबीसी समाजाला सत्तेत योग्य वाटा मिळावा, असे म्हटले आहे. सुषमा अंधारे यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरल्याचे देखील बघायला मिळतंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभेचा निकाल लागलाय. या निकालामध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे बघायला मिळतंय. लाडक्या बहिणींमुळे हे यश मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा महायुतीला काहीच फटका बसला नसल्याचे स्षष्ट झालंय. उलट महाविकास आघाडीला धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठ्या पक्ष भाजपा ठरलाय. शरद पवार गटापेक्षा अधिक सीट अजित पवार गटाला मिळाल्या आहेत. आता मुख्यमंत्री कोण होणार, यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री पदाबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये, जी तूफान व्हायरल होताना दिसतंय.

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, साम-दाम-दंड-भेद कपटकारस्थान मॅनेजमेंट सगळं करून एकदाची महाविनाश युती जिंकली. आता चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्री पदाची… तसं पाहिलं तर भाजपाच्या सोबत अपक्ष आले तरीसुद्धा भाजप स्वतःच्या जीवावर सरकार बनवू शकते. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांची भाजपला गरज पडणार नाही.

पुढे अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले, पण जर भाजपचं सरकार येणारच असेल तर मग महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या ओबीसी भावंडांनी भाजपाला मतदान केलं असा भाजपचा दावा आहे त्या ओबीसी भावंडांना सत्तेचा वाटा मिळायला हवा आणि मुख्यमंत्री करायचाच असेल तर मग तो ओबीसीचा का नको? उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये पाच वेळा महिला मुख्यमंत्री होऊ शकते. निव्वळ प्रचाराच्या वेळेला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांची आठवण करणारे मोदी शाह यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री द्यायला काय हरकत आहे?
अंधारे यांनी पुढे म्हटले, ओबीसी महिला मुख्यमंत्री असे एका दगडात दोन पक्षी होऊ शकतात. भाजपाने पंकजा मुंडे यांचे नाव पुढे करायला हवे. म्हणजे एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या ओबीसींना आणि महिलांना न्याय मिळेल. शिवाय महिला मुख्यमंत्रीपदाचा इतिहास करून दाखवला याची टिमकी वाजवायला ही भाजपा मोकळी. पण भाजपा असं करणार नाही, तिथल्या ओबीसींना नेतृत्व देण्याची जी दानत होती ती फक्त सरसेनापती शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच …!! ज्यांनी गोपीनाथ मुंडे किंवा छगन भुजबळ यांच्या रूपाने ओबीसींना संधी दिली…

लोक आता सुषमा अंधारे यांच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकप्रकारे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून थेट पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा असेच म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी थेट म्हटले होते की, मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्यामध्येच आता सुषमा अंधारे यांनी शेअर केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय नक्कीच ठरल्याचे बघायला मिळतंय.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.