Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Supriya Sule On Election Result: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला फक्त १० जागांवर विजय मिळवता आला. या निकालानंतर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या निकालातून नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढू. राज्यातील शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण तसेच सर्व घटकांसाठी आम्ही कायम लढत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.
तुमच्या मतदारसंघात कोण विजयी झाले? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी एका क्लिकवर
पराभव झाला असला तरी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे अभिनंदन देखील केले. नवे लोकप्रतिनिधी राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. निवडणूकत पक्षासाठी काम केलेल्या सर्व नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे तसेच निवडणूक आयोगाचे आणि प्रसार माध्यमांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.
भाजप मनाचा उदारपणा दाखवणार का? सत्तास्थापन झाल्यानंतर महायुतीला घ्यावा लागणार सर्वात मोठा निर्णय
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो कौल दिला तो अतिशय नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू. आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची ही पालखी निष्ठेने, सर्व शक्तीनिशी पुढे नेऊ. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
विराटचे पर्थमधील शतक साधेसुधे नाही! भारताच्या किंगने सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला
महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण काम कराल ही अपेक्षा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी, निवडणूक आयोग,निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया आदी सर्वांनी सक्रिय योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव जागता ठेवून पार पाडला, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद