Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नांदेडात वारं फिरलं, तीन वेळा पराभूत झालेल्या बाबुरावांचे नशीब उजळले; काँग्रेसच्या उमेदवारावर घेतली मोठी आघाडी

5

Baburao Kadam won in Hadgaon Assembly with Big Margin: बाबुराव कदम कोहळीकर यांनी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचा पराभव केला आहे. या विजयानंतर हदगाव मतदारसंघात एकच चर्चा सुरु झाली आहे. आता आला बाबुराव…आता आला बाबुराव… या गाण्यावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला आहे.

Lipi

नांदेड : विधानसभा निवडणूकीत उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक विद्यमान आमदारांसह दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यातच जिल्ह्यातील हदगाव मतदारसंघात सलग तीन वेळा शिंदे शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर यांना चौथ्या वेळी मात्र मोठे मताधिक्य घेऊन गुलाल लागला आहे. बाबुराव कदम कोहळीकर यांनी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचा पराभव केला आहे. या विजयानंतर हदगाव मतदारसंघात एकच चर्चा सुरु झाली आहे. आता आला बाबुराव…आता आला बाबुराव… या गाण्यावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला आहे.

बाबुराव कदम कोहळीकर यांची हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात लोकनेता म्हणून ओळख आहे. २००९ साली त्यांनी शिवसेनेकडून हदगाव हिमायतनगर मधून विधानसभेची निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर ही त्यांनी मतदार संघात पकड मजबूत केली. २०१४ निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आले, मात्र यावेळी उमेदवारीवरून शिवसेनेत उलथापालथ पाहायला मिळाली आणि बाबुराव कदम यांना ऐनवेळी स्वतःचा एबी फॉर्म नागेश पाटील आष्टीकर यांना देऊन माघार घ्यावी लागली . आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन मातोश्रीकडून देण्यात आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत आश्वासनाची पूर्तता काही करण्यात आली नाही. शिवसेनेने बाबुराव कदम ऐवजी पुन्हा नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे नाराजी झालेले कोहळीकर यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला असला तरी ते दोन नंबरला होते, तर नागेश पाटील आष्टीकरांचा पराभव झाला होता. या राजकीय घडामोडीनंतर बाबुराव कदम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
Mahayuti Candidates wins Maharashtra Nanded Assembly Election: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात वारं फिरलं, अशोक चव्हाणांच्या खेळीने भोकरसह नांदेडातून मविआ हद्दपार
२०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाकडून संधी देण्यात आली होती. पण नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून पराभव झाला. दोन वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानने चर्चेचा विषय बनला होता. त्यातच विधानसभा निवडणुकीत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी देत पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. जिल्ह्यात इतर मतदार संघापैकी हदगाव मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कोहळीकर हे आमने सामने होते. यावेळी हदगाव मतदारसंघातील जनतेने कोहळीकरांचं पारडं जड केलं आहे. बाबुराव कोहळीकर यांना तब्बल १ लाख १३ हजार २४५ मतं पडली. तर काँग्रेसचे उमेदवार माधव पाटील जवळगावकर यांना ८३ हजार १७८ मतं मिळाली, वंचितचे उमेदवार दिलीप राठोड हे ११ हजार ४०९ मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ३० हजार ६७ मतांनी बाबुराव कोहळीकर हे विजयी झाले. तब्बल चार निवडणुकींनंतर त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.