Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Weekly Horoscope 25 November to 1 December 2024 :मीनसह ४ राशी चिंतेत राहातील! वागण्यावर नियंत्रण ठेवा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 25 November to 1 December 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात गजकेसरी योग तयार झाला आहे. चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण झाल्याने गुरु आणि चंद्र एकमेकांच्या समोर येतील आणि सातव्या घरात प्रवेश करतील. त्यामुळे काही राशींना चढ-उताराचा सामना करावा लागेल. कामाचा ताण वाढू शकतो. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात गजकेसरी योग तयार झाला आहे. चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण झाल्याने गुरु आणि चंद्र एकमेकांच्या समोर येतील आणि सातव्या घरात प्रवेश करतील. त्यामुळे काही राशींना चढ-उताराचा सामना करावा लागेल. कामाचा ताण वाढू शकतो. तुम्हाला आरोग्य आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. या काळात पोटाशी संबंधित आजार त्रास देतील. खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या. या काळात तुम्हाा मालमत्तेशी संबंधित कोटार्च्या फेऱ्या माराव्या लागतील. घरातील अचानक खर्चामुळे बजेट बिघडू शकते. आरोग्याबाबत काळजीत राहाल. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
मेष – वागण्यावर नियंत्रण ठेवा

हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल. आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होईल. कामाचा ताण वाढू शकतो. तुम्हाला आरोग्य आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. या काळात पोटाशी संबंधित आजार त्रास देतील. खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचे हितचिंतक नाराज होतील. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवास सुखकर होईल. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे मिळेल. करिअरमधील अडथळा दूर होईल. जोडीदाराबद्दल मन चिंतेत राहू शकते. तुमचा जोडीदार कठीण प्रसंगी आधार बनेल.
भाग्यशाली रंग : सोनेरी
भाग्यशाली अंक : 9
वृषभ – बजेट बिघडेल

या आठवड्यात कुटुंबातील काही मोठ्या जबाबदारीने करतील. तुमच्या पालकांसह सदस्यांचे सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाा मालमत्तेशी संबंधित कोटार्च्या फेऱ्या माराव्या लागतील. घरातील अचानक खर्चामुळे बजेट बिघडू शकते. आरोग्याबाबत काळजीत राहाल. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. कामात अधिक व्यस्त असाल. कुटुंबाला कमी वेळ द्याल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ राहिल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत मिळतील. प्रगतीची नवी दिशा मिळेल. मैत्रीचे रुपातंर प्रेमात होईल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
भाग्यशाली रंग : नारंगी
भाग्यशाली अंक : 11
मिथुन – कामात मोठे यश मिळेल

या आठवड्यात नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला मोठे अधिकार आणि जबाबदाऱ्या मिळतील. काम वेळेत पूर्ण कराल. तुमच्या हितचिंतकांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून सगळ्यात सोबत एकमताने चाला. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. तुम्हाला सावध राहाणे गरजेचे आहे. न्यायालयाशी संबंधित कामात मोठे यश मिळेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. तुमचा आदर वाढेल. धार्मिक कार्य सप्ताहाच्या शेवटी पूर्ण कराल. प्रेमसंबंध दृढ होतील. तुमचा परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. तुमच्या प्रगतीत जोडीदाराचे विशेष योगदान असेल.
भाग्यशाली रंग : राखाडी
भाग्यशाली अंक : 12
कर्क – नुकसान होण्याची शक्यता

या आठवड्यात अचानक मोठी समस्या भेडसावू शकते. आपल्या विवेकबुद्धी आणि मित्रांच्या मदतीने यावर मात करण्यास सक्षम असाल. छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे टाळा. इतरांच्या चुकांसाठी दोष देणे टाळा. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वैयक्तिक संबंध टाळा. तुमचे काम दुसऱ्याकडे देऊ नका. नुकसान आणि अपमान सहन करावा लागेल. व्यवसायाच्या संदर्भात विनाकारण धावपळ करावी लागेल. मालमत्तेत पैसे गुंतवणूक करणे टाळा. विरोधक आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहा. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा थोडा त्रासदायक ठरेल. प्रिय जोडीदाराशी कोणतेही मतभेद किंवा गैरसमज त्यांच्यापासून दूर राहा. मन अस्वस्थ राहिल. वादाऐवजी संवाद साधा. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल.
भाग्यशाली रंग : जांभळा
भाग्यशाली अंक : 8
सिंह – जुने आजार त्रास देतील

सिंह राशीचा लोकांना मानसिक तणाव, कौटुंबिक वाद आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्हाला पैसा आणि वेळेचे व्यवस्थापन करावे लागेल. सुरुवातीला काही जुने आजार त्रास देतील. कामावर परिणाम होईल. तुमचे मन उदास राहिल. हितचिंतकांकडून सहकार्य हवे तसे मिळणार नाही. मैत्रिणीच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन कामांची संधी मिळेल. राजकारणातील लोकांना मोठे यश मिळेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. प्रेमसंबंध घट्ट होतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवन सुखी असेल.
भाग्यशाली रंग : तपकिरी
भाग्यशाली अंक : 1
कन्या – लांबचा प्रवास करावा लागेल

या आठवड्यात अपेक्षित यश मिळेल. जास्त मेहनत आणि परिश्रम करावे लागतील. सुरुवातीला काही कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी जोखीम पत्करावी लागेल. तुमच्या कौशल्याचा आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर करा. जवळच्या व्यक्तीकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. कामाची प्रशंसा करेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. घरकामात वेळ जाईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमविवाहात ग्रीन सिग्नल मिळेल. आरोग्य सामान्य राहिल.
भाग्यशाली रंग : गुलाबी
भाग्यशाली अंक : 10
तुळ – व्यवसायात नफा

हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहिल. या आठवड्यात प्रत्येक पावलावर आनंद आणि सौभाग्य मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत कराल. वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. तुम्हाला पूर्ण मेहनत घ्याव लागेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त असाल. तीर्थक्षेत्राचे प्रवास कराल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. खर्च वाढून व्यवहारातील अडचणी दूर होऊ शकतात. चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल.
भाग्यशाली रंग : हिरवा
भाग्यशाली अंक : 4
वृश्चिक -आर्थिक स्थिती सुधारेल

हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आणि सौभाग्याचा असेल. उदरनिर्वाहासाठी तुमचा त्रास संपेल. घरात धार्मिक शुभ कार्यक्रम घडतील. कुटुंबातील सदस्यांना खूप दिवसांनी भेटाल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ असेल. व्यवसाय वाढवण्याचा विचार या आठवड्यात पूर्ण होईल. परदेशाशी संबंधित लोकांना भरपूर फायदा मिळेल. सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारेल. संचित संपत्तीत वाढ होईल. कोर्टातील निर्णय तुमच्या बाजूने लागतील. प्रेमसंबंधातील अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी असेल.
भाग्यशाली रंग : लाल
भाग्यशाली अंक : 6
धनु – कामात यश मिळेल

हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामात अधिक अडथळे येतील. मित्रांची मदत होईल. कुटुंबातील समस्यांचे निराकरण होईल. कामाच्या बाबतीत धावपळ करावी लागेल.तुमचा अतिरिक्त खर्च वाढेल. घरात धार्मिक कार्य होतील. सत्ता आणि सरकारी कामात मोठे यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदारांच्या सन्मानात वाढ होईल. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल.
भाग्यशाली रंग : पिवळा
भाग्यशाली अंक : 7
मकर – पैशांचे व्यवहार जपून करा

हा आठवडा चढ-उतारांचा असेल. शारीरिक आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. तुमच्या कामावर परिणाम होईल. नोकरदार लोकांची बदनामी होऊ शकते. अचानक खर्च वाढल्याने समस्या पण वाढतील. व्यावसायिकांना कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. पैशांचे व्यवहार करताना सावध राहा. मोठे नुकसान सहन करावे लागेल. नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. वाहन जपून चालवा. प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील.
भाग्यशाली रंग : निळा
भाग्यशाली अंक : 3
कुंभ – बोलण्यावर नियंत्रण ठेवा

या आठवड्यात विचारपूर्वक बोला, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. नोकरदार लोकांच्या काही मुद्द्यावरुन वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. काम अतिशय काळजीपूर्वक करा. व्यावसायिक व्यवहार सावधगिरीने करा. आर्थिक नुकसान होईल. तुम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतील वाद मिटवाल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. प्रेम संबंधांच्या बाबतीत, हा आठवडा तुम्हाला सावधगिरीने पुढे जाण्याचा इशारा देत आहे.
भाग्यशाली रंग : काळा
भाग्यशाली अंक : 2
मीन – चिंतेत सापडाल

हा आठवडा संमिश्र असेल. कामात आणि व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. आरोग्याबाबत थोडे चिंतेत राहाल. जुन्या आजारांना सामोरे जावे लागेल. मौल्यवान वस्तूंबद्दल सावध राहा. निष्काळजीपणामुळे गोष्टी बिघडतील. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. कामात अडथळे येतील. भावंडांचे आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.
भाग्यशाली रंग : पांढरा
भाग्यशाली अंक : 5