Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra New Chief Minister from Mahayuti: मुख्यमंत्रिपदाचं एक नवीन सूत्र समोर आलं आहे. त्यानुसार तिन्ही प्रमुख नेत्यांना महाराष्ट्राचं प्रमुखपद भूषवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
महायुतीच्या बैठकीत दोन फॉर्म्युलांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पहिला फॉर्म्युला म्हणजे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याबाबत असल्याचं वृत्त ‘टीव्ही९ मराठी’ वाहिनीने दिलं आहे. अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युलासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जात आहे. कारण त्यानुसार, केवळ भाजप आणि शिवसेना यांना मुख्यमंत्रिपद वाटून दिलं जाणार आहे.
CM Oath Ceremony : मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर, विधानसभेची मुदत संपल्यास राष्ट्रपती राजवट? सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट
याशिवाय २-२-१ अशा दुसऱ्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्याप्रमाणे भाजप-शिवसेना प्रत्येकी दोन-दोन वर्ष, तर अजित पवार एक वर्ष मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. साहजिकच या मागणीसाठी अजितदादांचा गट आग्रही आहे. मात्र यापैकी कुठल्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार, की पाचही वर्ष एकालाच मु्ख्यमंत्रिपद दिलं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शपथविधी लांबणीवर
सध्याच्या विधानसभेची मुदत २६ तारखेला संपत असली, तरी नव्या सरकारचा शपथविधी त्याआधीच होणे बंधनकारक नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाधिवक्त्यांचीही राज्यपालांसोबत या विषयावर बैठक झाली. यापूर्वीही निकालाच्या १० ते १५ दिवसांनंतर शपथविधी आणि सत्तास्थापना झालेली आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवीन सत्ता स्थापना न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची धारणाही चुकीची असल्याची माहिती आहे.
Nana Patole : दिल्लीला या, काँग्रेसच्या हाराकिरीनंतर पटोलेंना तातडीचं बोलावणं, संघटनात्मक बदलांचे संकेत
महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे कुठलीही धाकधूक नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणंही आवश्यक आहे. त्यानंतर केंद्रीय नेतृ्त्वासोबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची दिल्लीत संयुक्त बैठक होईल. या बैठकीत पुढील निर्णय होईल.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघा प्रमुख नेत्यांचा आधी शपथविधी होईल. २७ ते २९ नोव्हेंबरच्या दरम्यान शपथविधी होण्याचे संकेत आहेत. उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नंतर होण्याची चिन्हं आहेत.
मंत्रिमंडळाचे संभाव्य सूत्र
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून त्यानुसार २१-१२-१० अशी मंत्रिपदांची विभागणी होऊ शकते. भाजपला सर्वाधिक म्हणजे २१, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.