Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड

14

karan arjun re release box office collection: नव्वदच्या दशकातले अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत. यातल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. त्यातही ‘तुंबाड’ सारख्या कलाकृतीनं री-रीलीजनंतर मिळवलेलं यश चकीत करणारं ठरलं. सिनेमाचं योग्य मार्केटिंग करणं किती आवश्यक असतं, हे ही यातून समोर आलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: जुने सिनेमे पुन्हा रीलीज करण्याचा ट्रेंड सध्या वाढतोय. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वीर-झारा’, ‘कल हो ना हो’ या कलाकृतींनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. याच पार्श्वभूमीवर राकेश रोशन दिग्दर्शित आणि ज्येष्ठ कलाकार राखी, अमरिश पुरी; तसंच शाहरुख खान, सलमान खान, काजोल, ममता कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला ‘करण-अर्जुन’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातले संवाद, गाणी गाजली. या चित्रपटाच्या प्रदर्शनातलं वेगळेपण म्हणजे री-रीलीज होतानाही देशभरातल्या अकराशेहून अधिक चित्रपटगृहांत या चित्रपटाचे दररोज दोन हजार दोनशे आठ शो दाखवले जात आहेत. चित्रपट परदेशातही प्रदर्शित झाला असून तिकडे दररोज अडीचशे शो दाखवण्याचं नियोजन निर्मात्यांनी केलंय. एकाच वेळी देश-विदेशात प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

करण अर्जुनं सिनेमानं री-रीलीजनंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं आकड्यांवरून दिसतंय.

कमाई किती?
काही रिपोर्टनुसार करण अर्जुन सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २५ लाखांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी कमाईत ४० टक्के वाढ झाली होती.दुसऱ्या दिवशी सिनेमानं ४० लाखांचा गल्ला जमवला होता.तिसऱ्या दिवशी सिनेमानं ४३ लाख कमाई केली.सिनेमाची एकूण कमाई ही १ कोटी आठ लाखांच्या जवळपास झाली आहे. या सिनेमानं री रीलीज सिनेमांमध्ये नवीन रेकॉर्ड रचलाय. री रीलीज चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्यां चित्रटांच्या यादीत हा सिनेमा आता तिसऱ्या क्रमांकावर आलाय.

‘मेरे करन-अर्जुन आएंगे… जरुर आएंगे…!’ असं १९९५ साली सिनेमातील आईनं म्हटलं आणि आता पुन्हा एकदा करण-अर्जुन खरंच आले आहेत; तेही सिनेमागृहात. नव्वदीच्या दशकांत गाजलेल्या ‘करण अर्जुन’ या सिनेमाचा चाहतावर्ग मोठा आहे. कलाकार मंडळी, दिग्दर्शन, गाणी, कथानक अशा सर्वच बाजूंनी उजवा ठरलेल्या या सिनेमाचा आनंद आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा घेता येत आहे.या सिनेमात शाहरुख खान आणि सलमान खान यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. त्यामुळं तेव्हाचे दोन सुपरस्टार एकत्र आल्यानं त्यावेळी ‘करण अर्जुन’ची चांगलीच चर्चा होती.
मालिकेत असं बनवलेलं उल्लू, केवळं घरच नाही तर या सीनचं शूटही समृद्धी बंगल्यातच, मिलिंद गवळींनी केली भांडाफोड

बाबो! ‘करण अर्जुन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ , तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई, रचला नवीन रेकॉर्ड

बॉलिवूडची आघाडीची नायिका पण किशोर कुमार माहित नाही! पहिल्याच भेटीत आलियाने रणबीरला विचारलेलं ते कोण ?
ज्येष्ठ अभिनेत्री राखी यांचा ‘मेरे करन-अर्जुन आएंगे’ हा संवाद तर हिट झाला. शाहरुख-सलमानच्या दुहेरी भूमिका यामुळंही सिनेमा वेगळा ठरला होता. सिनेमाच्या रीरीलीजबद्दल सलमान खान यानं सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. ‘राखी जी यांनी सिनेमात एकदम योग्य म्हटलं होतं की, ‘मेरे करन-अर्जुन आएंगे…’ जगभरातील सिनेमागृहांमध्ये नोव्हेंबरमध्ये’ असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं होतं. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात या सिनेमाला ३० वर्षं पूर्ण होणार आहेत. त्यामुळं शाहरुख-सलमानच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा परत चित्रपटगृहात जाऊन बघणं पर्वणी असणार आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.