Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणवासियांच्या प्रवासाला पुन्हा ब्रेक, कशेडी घाटाच्या बोगद्यातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद

5

Kashedi Ghat traffic flow closed again for Konkan: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित असलेल्या कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याच्या विद्युतीकरणासह पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूकीत खंड पडला आहे. सध्या एका बोगद्यातून वाहतूक सुरू होती मात्र शनिवारी मध्यरात्रीपासून या बोगद्यातील देखील वाहतूकही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

Lipi

प्रसाद रानडे, रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित असलेल्या कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याच्या विद्युतीकरणासह पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूकीत खंड पडला आहे. सध्या एका बोगद्यातून वाहतूक सुरू होती मात्र शनिवारी मध्यरात्रीपासून या बोगद्यातील देखील वाहतूकही अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. बोगद्यापासून काही अंतरावर २ ठिकाणी पूल उभारण्यात येणार असून येथे गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बोगद्यातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. काम पूर्ण होण्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवघड घाटमार्गाचा पर्यायचच वाहनचालकांसमोर असणार आहे. कशेडी घाट मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

कशेडी बोगद्यातील वाहतूक चर्चेचा विषय ठरत आली आहे. कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यापासून अनेक बिघाडांमुळे वाहतूक बंद ठेवावी लागली, हा सिलसिला अद्याप सुरू आहे . पावसाळ्यात बोगद्यात ठिकठिकाणी लागलेल्या गळत्यांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवरच होता.

एकीकडे कशेडी बोगद्यातून वाहनचालकांचा प्रवास सुस्साट अन् आरामदायी झाला आहे. तर दुसरीकडे कोणत्याही क्षणी बोगद्यातील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनचालकांना माघारी परतावे लागत आहे. कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाच्या कामासह अंतर्गत कामे व दुसऱ्या बोगद्यापासून काही अंतरावर पुलाच्या उभारणीसाठी २२ सप्टेंबरपासून वाहतूक बंद करण्यात आली. सद्यस्थितीत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या उभारणीसह अंतर्गत कामे वेगाने सुरू आहेत. या कामांसाठी ५०हून अधिक कामगारांची फौज दिवस-रात्र कार्यरत आहे. वर्षअखेरीस दुसरा बोगदा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आल्याने एका बोगद्यातूनच दोन्ही दिशांची वाहतूक सुरू आहे. कशेडी घाटातील रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे सर्वच वाहनचालक बोगद्यातूनच प्रवास करण्यास मुभा देत असल्याने बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ प्रसंगी वाहतूक कोंडीही होत आहे.

कशेडीच्या एका बोगद्यातील दोन्ही दिशांकडील वाहतूक अव्याहतपणे सुरू असतानाच दोन पूल उभारणीसाठी गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे बोगद्यातील वाहतुकीला ‘ब्रेक’ लागण्याची वेळ राष्ट्रीय महामार्ग खात्यावर ओढवली आहे. वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे. बोगद्यापासून काही अंतरावर दोन पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी १५ ते. २० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून बोगद्यातील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. बोगद्यातील वाहतुकीला ब्रेक लागल्याने पर्यायी कशेडी घाटाचा वाहतुकीसाठी वापर केला जात आहे.

कशेडी घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बोगद्यातील वाहतूक सुरु झाल्यापासून पर्यायी कशेडी घाटाचा क्वचितच वापर केला जात असल्याने डागडुजीकडे फारसे लक्षच देण्यात आलेले के नाही. या मार्गावर जागोजागी पडलेल्या खङ्खधांमुळे वाहनचालकांची कसरत सुरू होती. काही एसटी बसेस वगळता सर्वच वाहने बोगद्यातूनच मार्गस्थ होत होती.

कशेडी घाटातून पुन्हा जिकरीचा प्रवास

शनिवारी मध्यरात्रीपासून बोगद्यातील वाहतूक बंद झाल्यापासून पर्यायी कशेडी घाटाचा वापर सुरू झाला आहे. वाहनांच्या बेसुमार संख्येमुळे खड्ड्यांचा विस्तार वाढतच आहे. त्यात अवजड वाहतुकीची भर पडल्याने मार्गाच्या दुरावस्थेत नवी भर पडली आहे. या घाटातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संघर्षाच्या पुढे प्रवासाची दयनीय अवस्था असताना जाता कशेडी घाटातून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. या मार्गावर पूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.