Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Thane Vidhan Sabha Nivadnuk News: राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे नेतेमंडळींनाही मंत्रिपदाचे वेध लागेल आहेत. यावरुन ठाण्यात बॅनरबाजी करत नेत्यांचे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून १८ पैकी १६ जागांवर युतीचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या बड्या नेत्यांना मंत्रिपदाची स्वप्न पडत आहेत. यामध्ये ओवळा – माजिवडा येथून चौथ्यांदा आमदार झालेल्या प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात ‘भावी मंत्री’ अशा आशयाचे होर्डिंग लावले आहेत. गेल्या टर्ममध्ये मंत्रिपद हुकलेल्या सरनाईक यांना यंदा तब्बल एक लाख ८ हजार १५८ इतके मताधिक्य मिळाले असून राज्यातील १ लाख ८४ हजार १८७ हजार इतकी सर्वाधिक मतेही त्यांनी मिळवल्याने त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी ठाण्यात देवाला साकडे, मंदिरांमध्ये महिलांच्या महाआरत्या, दर्ग्यातही सामूहिक प्रार्थना
विद्यमान मंत्र्यांची दावेदारी प्रबळ
विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांना यंदा कोणते ‘वजनदार’ खाते मिळते, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. यासोबतच नवी मुंबईतील बडे प्रस्थ व माजी पालकमंत्री गणेश नाईक, तब्बल पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले मुरबाडचे किसन कथोरे, अंबरनाथमधून चौथ्यांदा विजयी झालेली डाॅ. बालाजी किणीकर यांच्या मंत्रीपदाच्या आशा यंदा पल्लवित झाल्या आहेत.
खानदेशात महायुतीचा स्ट्राईक रेट जोमात, पण केवळ एक जागेवर शिवसेनेमुळे अजित पवारांचा घात
Thane News : ठाणे जिल्ह्यातील मातब्बरांची मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी; शहरात भावी मंत्री, नामदार बॅनर झळकले
‘हॅट्ट्रिक’ आमदारही शर्यतीत
विधानसभेत दाखल होण्याची ‘हॅट्रिक’ करणारे भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे संजय केळकर, भिवंडी पश्चिमचे भाजपचे महेश चौघुले, भिवंडी ग्रामीण येथील शिवसेनेचे शांताराम मोरे, बेलापूरच्या भाजपच्या मंदा म्हाञे असे आमदारही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणारे एकमेव आमदार दौलत दरोडा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रिपदाची संधी मिळते का, याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.