Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पराभूत झालेल्या ठाकरेंच्या उमेदवाराच्या घरासमोर शस्त्र दाखवून हुल्लडबाजी, शिंदे गटाच्या आमदारांचा मुलगा अडचणीत

3

Balaji Kalyankar problems will increase: विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडून पिस्टल आणि शस्त्र दाखवून हुल्लडबाजी करण्याचा धक्कादायक प्रकार नांदेड उत्तर मतदारसंघात घडला आहे. ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवाराला डिवचणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांना महागात पडले आहे.

Lipi

नांदेड : विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडून पिस्टल आणि शस्त्र दाखवून हुल्लडबाजी करण्याचा धक्कादायक प्रकार नांदेड उत्तर मतदारसंघात घडला आहे. ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवाराला डिवचणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांना महागात पडले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आमदार पुत्र आणि भावासह इतर २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे फटाक्यांच्या आतिषबाजीत समर्थकांची चार चाकी गाडी देखील जळाली होती. या घटनेनंतर नांदेडमध्ये ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना मध्ये मोठा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे.

शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. तर ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांचा दारुण पराभव झाला आहे. विजयाचा जल्लोष करण्याच्या हेतूने काही समर्थक जीपमधून विजय नगर संगीता डक यांच्या घरासमोर आले. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत डक यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता पिस्टल आणि शस्त्र घेऊन थेट घरावर धाव सुद्धा घेतली.
Indraneel Naik : सलग ७२ वर्ष एकाच कुटुंबाचं एका मतदारसंघावर वर्चस्व, दोन मुख्यमंत्री दोन मंत्री, आताही रेकॉर्डब्रेक विजय
या सर्व प्रकारात आमदार बालाजी कल्याणकर यांचे चिरंजीव सुहास कल्याणकर, त्यांचा भाऊ एकनाथ कल्याणकर हे देखील सहभागी होते, असा आरोप डक कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान फटाके फोडत असताना डक समर्थकाची चार चाकी गाडी देखील जळाली आहे. या घटनेनंतर विजयनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान याप्रकरणी विठ्ठल पाटील डक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शिवाजीनगर पोलिसांनी सुहास कल्याणकर, एकनाथ कल्याणकर यांच्यासह इतर १५ ते २० जणा विरोधात कलम गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक तांदळे हे पुढील तपास करत आहेत. या गंभीर प्रकरणानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.