Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Amit Shah: विधानसभा निवडणुकीतील नेत्रदीपक विजयानंतर आता महायुतीत सत्तेतील वाट्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. तब्बल १३२ जागा जिंकणारा भाजप मुख्यमंत्री सोडण्यास तयार नाहीत. तर अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही आहेत.
भाजपनं १४८ जागा लढवत १३२ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेनं ८० जागा लढवून ५७ जागा जिंकली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी बरेच आग्रही आहेत. आपणच मुख्यमंत्री राहिल्यास त्याचा महायुतीला कसा फायदा होईल, हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. त्यासाठी ते भाजप नेतृत्त्वाशी वाटाघाटी करत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा म्हणत आपलं वजन देवेंद्र फडणवीसांच्या पारड्यात टाकलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा उद्या मुंबईत येत आहेत. भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तीन फॉर्म्युल्यांच्या आधारे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरू शकतो.
Eknath Shinde: शिंदेच व्हावेत पुन्हा मुख्यमंत्री! शिवसेनेची एकमुखी मागणी, ६ प्रमुख कारणांची यादीच वाचली
सरप्राईज चेहरा दिला जाण्याची शक्यता
महायुतीमधील मित्रपक्षांना सत्तेत वाटा देण्यासाठी भाजप नव्या सरकारमध्ये दोघांना उपमुख्यमंत्रिपद देईल. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजपनं वापरलेला फॉर्म्युला चर्चेत आहे. तिकडे भाजप नेतृत्त्वानं भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रिपद दिलं. शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले होते. त्यांना थेट मुख्यमंत्री करण्यात आलं. तशाच प्रकारे भाजप एका नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकतो.
कॅबिनेटमधील वरिष्ठ सहकारीदेखील स्पर्धेत
भाजपला महाराष्ट्रात मध्य प्रदेशप्रमाणेच तीन चतुर्थांश बहुमत मिळालं आहे. मध्य प्रदेशात भाजपनं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना हटवून मोहन यादव यांच्याकडे धुरा सोपवली. यादव त्याआधी सिंह यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्याच प्रकारे एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्रिपदी बढती मिळू शकते.
CM पद सोडा, त्याबदल्यात…; भाजपकडून शिंदेंना ऑफर, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला
बिहार पॅटर्न, शिंदेच मुख्यमंत्री?
तिसरा फॉर्म्युला बिहारचा आहे. बिहारमध्ये २०२० मध्ये एनडीएला बहुमत मिळालं. निकालात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांचे ४३ उमेदवार निवडून आले. पण भाजपनं कुमार यांना दिलेलं आश्वासन पाळलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. राज्यात महायुती शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभा लढली आहे. त्यामुळे बिहार पॅटर्नच्या आधारे शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात.