Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Vidhan Sabha Election Deposit Seize : कोथरूड, कसबा पेठ, खडकवासला आणि हडपसर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चारही उमेदवारांना डिपॉझिट वाचवणे अशक्य झाले. त्यात किशोर शिंदे, गणेश भोकरे, मयुरेश वांजळे आणि साईनाथ बाबर यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या इंदापूरच्या लढतीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. २१ आमदार; तसेच २१ पराभूत उमेदवारांसह जुन्नरमधील ‘राष्ट्रवादी’ चे अतुल बेनके, सत्यशील शेरकर आणि पुरंदर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे अशा ४४ जणांना ‘डिपॉझिट’ वाचवता आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पुणे कँटोन्मेंट, वडगाव शेरी, शिवाजीनगर, बारामती, इंदापूर, पुरंदर, चिंचवड, हडपसर, येथे डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार आहेत. विधानसभेसाठी जिल्ह्यातील २१ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २५९ उमेदवारांचे जप्त डिपॉझिट वाचविण्यासाठी पुरेशी मते मिळाली नाहीत. एकूण झालेल्या वैध मतांच्या एकषष्ठांश मते डिपॉझिट वाचविण्यासाठी पुरेशी असतात; परंतु जिल्ह्यात यंदाच्या अनेक मतदारसंघांत प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली होती; शिवाय ‘मनसे’ या पक्षासह वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय स्वराज्य सेना, राष्ट्रीय समाज पक्ष; तसेच अपक्ष राहिलेल्या असते.
विदर्भात २३ आमदार मंत्रिपदाच्या स्पर्धेत; भाजपकडून १६, शिवसेनेतून तीन तर राष्ट्रवादीकडून चौघे दावेदार
पुण्यात कोणाचे डिपॉझिट जप्त ?
पुणे शहरात कोथरूडमध्ये किशोर शिंदे, कसब्यात गणेश भोकरे, खडकवासल्यात मयुरेश वांजळे, हडपसरमध्ये साईनाथ बाबर आणि आंबेगावमध्ये सुनील इंदोरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही उमेदवारांचे डिपॉझिट वाचू शकले नाही. शिवाजीनगरमध्ये अपक्ष मनीष आनंद यांनाही पुरेशी मते मिळाली नाहीत. पर्वती मतदारसंघात बंडखोरी करणारे आबा बागूल यांना १० हजार ४७६ मते मिळाली. डिपॉझिट वाचविण्याइतकी त्यांना मते मिळविता आली नाहीत. पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातील ‘वंचित’चे नीलेश आल्हाट यांनी ८,८६९ मते मिळाली; त्यांनाही पुरेशी मते नाहीत. उमेदवारांनी प्रमुख पराभूत उमेदवारांचे मताधिक्य कमी करण्याचे काम केल्याचे निरीक्षण नोंदविले जात आहे.
निवडणुकीत प्रमुख विजयी उमेदवारांसह पराभूत यांच्यासह अन्य दोघांचे अशी ४४ उमेदवारांचेच डिपॉझिट वाचले आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम ‘अनामत रक्कम’ म्हणून जमा करणे बंधनकारक असते. त्यानुसार, सर्वसाधारण वर्गासाठी १० हजार, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारासह अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला प्रत्येकी पाच हजार रुपयांचे डिपॉझिट ठेवावे लागते. त्यानुसार जिल्ह्यातील रिंगणातील एकूण ३०३ उमेदवारांपैकी ४४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले आहे. मात्र, उर्वरित २५९ उमेदवारांना एकूण वैध मतांच्या एकषष्ठांशापेक्षा अधिक मते मिळू शकली नाहीत. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट गुल झाले आहे.
पुण्याकडे दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना भोवणार? जिल्ह्यात मिळाली केवळ एकच जागा
पुण्यात कोणाचे डिपॉझिट जप्त ?
पुणे शहरात कोथरूडमध्ये किशोर शिंदे, कसब्यात गणेश भोकरे, खडकवासल्यात मयुरेश वांजळे, हडपसरमध्ये साईनाथ बाबर आणि आंबेगावमध्ये सुनील इंदोरे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही उमेदवारांचे डिपॉझिट वाचू शकले नाही. शिवाजीनगरमध्ये अपक्ष मनीष आनंद यांनाही पुरेशी मते मिळाली नाहीत. पर्वती मतदारसंघात बंडखोरी करणारे आबा बागूल यांना १० हजार ४७६ मते मिळाली. डिपॉझिट वाचविण्याइतकी त्यांना मते मिळविता आली नाहीत. पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातील ‘वंचित’चे नीलेश आल्हाट यांनी ८,८६९ मते मिळाली; त्यांनाही पुरेशी मते नाहीत.
कॉंग्रेसची जादू ओसरली, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातून कॉंग्रेस गायब; तिन्ही उमेदवार पराभूत
पराभूत उमेदवारांचे वाचले डिपॉझिट जुन्नरमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा’चे उमेदवार अतुल बेनके, तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर यांना डिपॉझिट वाचवता आले. डिपॉझिट वाचविण्यासाठी त्यांना ३७ हजार २०२ मते हवी होती. मात्र, त्या दोघांना अनुक्रमे ४८ हजार १००; तसेच ६६ हजार ६९१ मते मिळाली. पुरंदर विधानसभा मतदारसंघात ४६ हजार ९४५ इतकी एकषष्ठांश मते मिळायला हवी होती. ‘राष्ट्रवादी’ च्या अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांना प्रत्यक्षात ४७ हजार १९६ मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट वाचले