Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vastu Shastra : तुमच्या घरात घडतात या विचित्र घटना ! असेल भूमीदोष, सावध व्हा! जाणून घ्या लक्षण, उपाय
What Is Bhumi Dosh: तुम्ही जिथे राहता तिथे भूमीदोष असेल तर तुम्ही आयुष्यात कधीच प्रगती करु शकणार नाही. भूमीदोष तुमच्या जीवनात प्रगती होवू देत नाही. सतत तुमच्या जीवनात अडचणी, संकटे येत असतात. घरात भांडण, अपघात आणि आजार होतात. नक्की काय आहे भूमीदोष, तो कसा होता आणि त्याचा प्रभाव कसा कमी करायचा ते जाणून घेवूया.
भूमीच्या तीन अवस्था
वास्तुशास्त्रानुसार भूमीच्या तीन प्रकारच्या अवस्था असून त्यात जागृत, सुप्त आणि मृत अवस्था यांचा समावेश आहे. या तीनही अवस्थांना जातकाच्या जन्म कुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तपासल्या जातात. कारण काही वेळा काय होते, जी भूमी मृत असते ती काही काळानंतर जागृत होते. भूमीची ही अवस्था नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी शनि आणि गुरुच्या संक्रमणाचा उपयोग केला जातो.
भूमीदोषाची लक्षणे
भूमीदोष आहे की नाही हे तुम्ही काही लक्षणांवरून समजू शकता. सर्वप्रथम त्या ठिकाणी असलेल्या झाडांची तपासणी करा, त्या ठिकाणी कोणती झाडं लागलेली आहेत हे पहा. जर तिथे काटेरी झाडं झुडपं आहेत तर ती भूमी जागृत अवस्थेत नाही. अशा जमिनीवर बांधकाम करणे किंवा बांधकाम झाल्यानंतरही अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, काही जमीनी अशा असतात जिथे आपोआप फुलं झाडे येतात,अशी भूमी सर्वोत्तम समजली जाते.
भूमीमधील विविध भाव-भावना
प्रत्येक ठिकाण हे वायुमंडळ, वातावरण आणि मनस्थिती यांच्याशी जोडलेले असते. शास्त्रात जागेची शुद्धी याला खूप महत्त्व आहे. काही ठिकाणं जसे की मंदिर येथे भक्तीचे अणू (Atoms of devotion) यांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मंदिरात आपल्याला सुखशांती समाधान मिळते. काही ठिकाणं ज्ञान प्रधान तर काही ठिकाणी कर्म प्रधान भावना जागृत होत असतात. मनात हे विविध भाव किंवा भावनांचे तरंग भूमीमुळेच येत असतात.
भूमीदोष यावरुन ओळखा
भूमीदोष असलेल्या घरात अनेकदा असे दिसून येते की पाळीव प्राणी जसे गाय, कुत्रा किंवा मांजर लवकर मरण पावतात. घरातील सदस्यांना अपघाताचा सामना करावा लागतो. रोड अपघात, छतावरून किंवा जिन्यावरुन पडणे वगैरे, घरात वेगवेगळे, चित्रविचित्र आवाज ऐकू येतात किंवा विचित्र आकृत्या दिसत आहेत असा भास होतो.
भूमीदोषावर उपाय
जर प्लॉट किंवा जमिनीमध्ये भूमीदोष असेल किंवा भूमीमध्ये शल्यदोष असेल, तर अशा स्थितीत त्या भूमीवरील दीड ते २ फूट माती काढून बाहेर फेकून द्यावी, त्यामुळे त्या भूमीचे सर्व दोष नष्ट होतात. भूमी दोष निवारणासाठी दरवर्षी विश्वकर्मा पूजा तसेच वर्षातून एकदा वास्तूशांती करावी. यामुळे भूमीदोष होण्यास मदत होते.